बलात्कारप्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा!

159

स्वयंघोषित धर्मगुरु आसाराम बापू याला गांधीनगर न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. यापूर्वी २५ एप्रिल २०१८ मध्ये जोधपूर न्यायालयाने आसारामला उत्तर प्रदेशातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात आसारामच्या पत्नीसह अन्य सहा आरोपी होते.

( हेही वाचा : नव्या उद्योगांना आता तत्काळ परवानगी मिळणार; मैत्री विधेयकाचा मसुदा सादर करण्यास मान्यता)

सुरतमधील महिलेचा आरोप

सुरतमधील एका महिलेने आसारामवर अहमदाबादच्या आश्रमात वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी अहमदाबादमधील चांदखेडा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. आसारामने या महिलेवर २००१ ते २००६ दरम्यान अनेकवेळा बलात्कार केला. याप्रकरणी आसाराम बापू याला गांधीनगर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा केली आहे.

उत्तर प्रदेशच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप

आसाराम बापूवर उत्तर प्रदेशच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही मुलगी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे आसारामच्या आश्रमात शिकत होती. आसाराम बापूने तिला जोधपूरच्या आश्रमात बोलावले होते आणि १५ ऑगस्ट २०१३ मध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आला. २३ ऑगस्ट २०१३ ला आसाराम बापूविरोधात गुन्हा दाखल झाल्यावर आसाराम समर्थकांनी कमला मार्केट पोलीस स्टेशनमध्ये तोडफोड केली. ३१ ऑगस्ट २०१३ मध्ये आसाराम बापूला जोधपूर पोलिसांनी अटक केली आणि त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.