Assembly Election 2023 : देशातील 5 राज्यांमधून 1760 कोटींची रोकड जप्त

निवडणुकीत काळ्या पैशांची उधळण

185
Assembly Election 2023 : देशातील 5 राज्यांमधून 1760 कोटींची रोकड जप्त

देशातील मध्यप्रदेश, मिझोराम, छत्तीसगड, तेलंगणा आणि राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान (Assembly Election 2023) होणार आहे. या पाचही राज्यात निवडणूक जाहीर झाल्यापासून 1760 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. यामध्ये गुरुवारी म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील गच्चीबावली येथून 5 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

देशातील 5 राज्यांमध्ये निवडणुका (Assembly Election 2023) जाहीर झाल्यापासून जवळपास 1760 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले होते. दरम्यान, 2018 मध्ये या 5 राज्यांमधून मिळालेल्या रोख रकमेपेक्षा हे प्रमाण 7 पट अधिक आहे. निवडणूक आयोग राज्य आणि केंद्रीय एजन्सींच्या सहकार्याने अशा प्रकारच्या कारवाया केल्या जातात.

(हेही वाचा – Pete Best : जगप्रसिद्ध संगीतकार आणि ड्रमर)

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, निवडणुकीच्या (Assembly Election 2023) घोषणेनंतर मध्यप्रदेश, मिझोराम, छत्तीसगड, तेलंगणा आणि राजस्थानमधून 1760 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर 2018 मध्ये या राज्यांमधून 239.15 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. यापूर्वी निवडणूक आयोगाने गुजरात, हिमाचल, नागालँड, मेघालय, त्रिपुरा आणि कर्नाटकमध्ये 1400 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली होती. गेल्या निवडणुकीत जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेच्या 11 पट हे प्रमाण आहे. (Assembly Election 2023)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.