उत्तर प्रदेश: कुख्यात गॅंगस्टरच्या मुलाचा स्पेशल टास्ककडून एन्काऊंटर

114

उत्तर प्रदेश येथील कुख्यात गँगस्टर अतिक अहमदच्या मुलगा असदचा एन्काऊंटर झाला आहे. उत्तर प्रदेशातील स्पेशल टास्ककडून झाशीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. प्रयागराज येथील उमेश पाल हत्याकांड मधील हा मुख्य आरोपी होता. त्या हत्याकांडपासून तो आणि त्याचा साथीदार फरार झाले होते. दोघांवर प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या एन्काऊंटरमध्ये असद सोबत त्याच्या साथीदारचादेखील एन्काऊंटर करण्यात आला आहे.

https://twitter.com/ANI/status/1646416203253161985?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1646416203253161985%7Ctwgr%5Ea54a72e9966a81bd8b7222daad5871c14f2cb08b%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Findia%2Fatiq-ahmad-son-asad-ahmed-killed-up-police-encounter-1167498

उत्तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डीएसपी नवेंदु आणि डीएसपी विमल यांच्या अध्यक्षतेखाली यूपीच्या एसटीएफसोबत झालेल्या चकमकीत त्या दोघांचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. पोलिसांनी त्या दोघांना आपले शस्त्रखाली टाकण्यास सांगितले होते, मात्र त्यांनी ते ऐकले नाही. त्यानंतर दोन्हीकडून गोळीबार सुरू झाला. त्या चकमकीत त्यांचा एन्काऊंटर झाला. पोलिसांना त्यांच्याकडून काही विदेशी हत्यारे मिळाली आहेत.

मुख्य सचिव संजय प्रसाद यांनी या एन्काऊंटरची माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिली आहे. या एन्काउंटरनंतर मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशच्या एसटीएफचे कौतुक केले. तसेच या एन्कांऊटरसंदर्भातील संपूर्ण अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर सादर करण्यात आला आहे.

(हेही वाचा – शीव हिंदु स्मशानभूमी चार महिने राहणार बंद, पण विद्युत आणि पीएनजीवरील दाहिनी राहणार सुरु)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.