दहशतवाद विरोधी पथकाने नवी मुंबई (Navi Mumbai) मधून दोन बांगलादेशी नागरिकांना (Bangladeshi Citizens) ताब्यात घेतले. खलील सैयद (३०) व हशमुलला शेख अशी ताब्यात घेण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत. (ATS Raid)
दोघेही नवी मुंबईतील कामोठे (Kamothe)परिसरात राहत असल्याची माहिती एटीएस, विक्रोळी यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. पडताळणीत दोघेही बांगलादेश येथील रहिवासी असल्याचे समजल्यानंतर त्यांना नवी मुंबईतील कामोठे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपींविरोधात भारतीय पारपत्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(ATS Raid)
(हेही वाचा : H1B Visa केवळ भारतीय आणि कॅनेडियन नागरिकांसाठी होणार सुरू)
काही दिवसांपूर्वी मुंबई गुन्हे शाखेने भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ९ बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. बनावट आधार कार्ड बनवण्यात आरोपींचा सहभाग होता. भारतातून बेकायदेशीरपणे बांगलादेशात पैसे हस्तांतरित केल्याचा आरोपही त्यांच्यावर होता. अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांचा मुख्य हेतू बेकायदेशीरपणे भारतातून बांगलादेशात पैसे हस्तांतरित करणे हा होता. या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community