ATS ची रत्नागिरीत मोठी कारवाई, खैराची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक, अटकेत असणाऱ्यामध्ये पडघ्यातील एका संशयिताचा समावेश

325
ATS ची रत्नागिरीत मोठी कारवाई, खैराची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक, अटकेत असणाऱ्यापैकी पडघ्यातील एका संशयिताचा समावेश
ATS ची रत्नागिरीत मोठी कारवाई, खैराची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक, अटकेत असणाऱ्यापैकी पडघ्यातील एका संशयिताचा समावेश

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे गाव येथे केलेल्या कारवाईत खैराची तस्करी करणाऱ्या ५ जणांना अटक करण्यात आली आहे.सावर्डे येथे करण्यात आलेल्या कारवाईचे पडघा कनेक्शन समोर येत आहे, अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये पडघा येथे काही महिन्यांपूर्वी एनआयए आणि एटीएसने (ATS) केलेल्या कारवाईतील एका संशयिताचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

( हेही वाचा :  हरियाणाच्या विधानसभा निकालानंतर, महायुतीच्या आशा पल्लवित; Ladki Bahin Scheme तारणार!

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील पडघा येथे काही महिन्यांपूर्वी एनआयए आणि महाराष्ट्र एटीएसने केलेल्या कारवाईनंतर पडघ्यातील काही संशयित एटीएसच्या (ATS) रडार होते, त्यापैकी एका संशयितांच्या हालचालीवर एटीएसचे बारीक लक्ष होते. या संशयिताचे कर्नाटक राज्यात सतत जाणे येणे सुरू झाल्यामुळे त्यांच्यावरील संशय आणखीनच बळावला. एटीएसने त्याच्या बारकाईने लक्ष केंद्रित केले असता सदर संशयित हा खैराच्या झाडाच्या तस्करीत गुंतला असल्याची माहिती एटीएसच्या हाती लागली.

पडघा येथील संशयित हा आपल्या काही सहकाऱ्यासोबत कर्नाटकातून खैराच्या झाडाची एक खेप घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे येणार असल्याची माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली. एटीएसने दि. १० ऑक्टोबर रोजी सावर्डे येथे सापळा रचून एका संशयित ट्रकासह पाच जणांना ताब्यात घेऊन ट्रकची तपासणी केली असता त्यात कोट्यवधी रुपये किंमत असलेल्या खैराची झाडे आढळली.

एटीएसने (ATS) पडघा येथील संशयितासह पाच जणांना या प्रकरणी अटक करून खैराने भरलेला ट्रक जप्त केला आहे, अटक करण्यात आलेले पाचही जण नाशिक, अहमदनगर आणि ठाणे जिल्ह्यातील पडघा येथील असल्याची माहिती समोर आली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,खैराच्या लाकडाची तस्करी करून येणारी रक्कम ही टेरर फंडिंगसाठी वापरत असावे,असा संशय व्यक्त करण्यात येत असून या अनुषंगाने या पाच जणांची चौकशी सुरू आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.