नागपूर पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी १८ ऑक्टोबर शहरातील (ATS Raid) हसनबाग परिसरात धाड टाकली. यावेळी परवेज पटेल नामक व्यक्तीच्या कार्यालयात एटीएसने धाड टाकून २७ लाख रुपये जप्त केले आहेत. तसेच याप्रकरणी ३ आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
या छाप्यांनंतर एटीएसने (ATS Raid) हसनबाग येथील रहिवासी परवेझ पटेल आणि त्याच्या साथीदाराला चौकशीसाठी ताब्यात घेतले. परवेझकडे बेहिशेबी रोख रक्कम असल्याची माहिती मिळाल्याच्या आधारे दुपारी या दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली “, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
(हेही वाचा – Lalit Patil : ड्रगमाफिया ललित पाटीलला पळून जाण्यास मदत करणाऱ्या ‘त्या’ दोघी पोलिसांच्या ताब्यात)
एटीएसने (ATS Raid) पटेलांच्या घरातून २७.५० लाख रुपयांची रोकड जप्त केली असून बेहिशेबी रोख रकमेचा स्रोत जाणून घेण्यासाठी त्यांची चौकशी करण्यात आली आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला मालमत्ता (ATS Raid) आणि वाहन विक्रेता असलेल्या पटेल यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, असे एटीएस अधिकाऱ्याने सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community