हल्लेखोराने केली Saif Ali Khan कडे एक कोटींची मागणी

141
हल्लेखोराने केली Saif Ali Khan कडे एक कोटींची मागणी
हल्लेखोराने केली Saif Ali Khan कडे एक कोटींची मागणी
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अलीयामा फिलिप (५६) नावाच्या स्टाफ नर्सने पोलिसांकडे तिचा जबाब नोंदवला आहे. तिने सांगितले की ज्याने सैफवर हल्ला करणारा प्रथम ज्या खोलीत घुसला होता जिथे ती आणि दुसरी मोलकरीण सैफच्या लहान मुलासह, जहांगीर उर्फ ​​जेहबाबा (४) सोबत झोपली होती. हिंदी आणि इंग्रजीमध्ये बोलणाऱ्या आरोपीला मूल हवे होते आणि त्याने सैफकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली, असा दावा फिलिपने आपल्या जबाबात  केला आहे. (Saif Ali Khan)
फिलिप गेल्या चार वर्षांपासून जहांगीरची परिचारिका आहे आणि मुलाची काळजी घेत आहे. जबाबात म्हटले आहे की, “१५ जानेवारीला मी जेहबाबाला जेवायला दिले आणि रात्री ११ च्या सुमारास मी त्याला झोपवले. नंतर, मी आणि जुनू नावाची दुसरी नर्स, जी जेहचीही काळजी घेते, त्याच बेडरूममध्ये झोपायला गेलो. पहाटे २ वाजता मला काही आवाजाने जाग आली. माझ्या लक्षात आले की बाथरूमची लाईट चालू होती; तथापि, मला वाटले की करीना मॅडम बाळाला तपासत असतील, म्हणून मी परत झोपी गेले. अजुनही काही ठीक वाटत नव्हते म्हणून मी उठून बसले,तेव्हा मला बाथरूमजवळ टोपी घातलेल्या माणसाची सावली दिसली.” (Saif Ali Khan)
फिलिपने सांगितले की जेव्हा ती बाथरूमजवळ आली तेव्हा तिने तो व्यक्ती जेहच्या पलंगाकडे जाताना पाहिला. “मी ताबडतोब जेहच्या पलंगावर गेले, पण त्या व्यक्तीने मला गप्प राहण्याचा इशारा केला. जुनूही जागा झाला, पण त्याने आम्हाला आवाज  न लावण्याची धमकी दिली. मी जेहला उचलले, असता त्या व्यक्तीने माझ्यावर लाकडी वस्तू आणि हॅकसॉ ब्लेड सारख्या धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला,  ब्लेडच्या हल्ल्यात माझ्या बोटांना दुखापत झाली. जेव्हा मी त्याला विचारले की त्याला काय हवे आहे, तेव्हा त्याने जेहबाबाच्या पलंगाकडे जाण्याचा प्रयत्न केला, तो इंग्रजीत म्हणाला १ कोटी रुपये. (Saif Ali Khan)
जुनू खोलीतून पळून जाण्यात यशस्वी झाला आणि त्याने आरडाओरडा केला, आरडाओरडा ने सैफ अली खोलीतून बाहेर आले,सैफ सरांनी त्याची चौकशी केली तेव्हा त्या व्यक्तीने त्याच्यावर धारदार हॅकसॉ ब्लेडने हल्ला केला. त्यानंतर तैमूरची नर्स गीता हिने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तिच्यावरही हल्ला करण्यात आला. मग आम्ही सगळे घराच्या वरच्या मजल्यावर धावलो. घरातील उर्वरित कर्मचारी जागे झाले, परंतु त्यांनी आरोपीचा शोध घेतला तोपर्यंत तो फरार झाला होता, ”तिच्या जबाबात पुढे म्हटले आहे. फिलीपने सांगितले की, हल्लेखोर ५.५ ‘उंच होता, त्याने काळी पँट, गडद शर्ट आणि टोपी घातली होती. तिचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे असावे. (Saif Ali Khan)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.