बोगस कागदपत्रे तयार करून MMRDA ची घरे लाटण्याचा प्रयत्न; ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १२ जणांना अटक

या प्रकरणी पोलिसांनी १२ जणांना अटक केली असून उर्वरित आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुन्हा दाखल झालेल्यापैकी बहुतांश परराज्यातील नागरिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

268
बोगस कागदपत्रे तयार करून MMRDA ची घरे लाटण्याचा प्रयत्न; ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १२ जणांना अटक

बोगस कागदपत्रांच्या आधारे एमएमआरडीएची (MMRDA) घरे लाटण्याच्या धक्कादायक प्रकार कुर्ला येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात जवळपास ६० जणांविरुद्ध बोगस कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी १२ जणांना अटक केली असून उर्वरित आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुन्हा दाखल झालेल्यापैकी बहुतांश परराज्यातील नागरिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कुर्ल्यातील बैलबाजार वॉर्डमध्ये येणाऱ्या संदेश नगर, क्रांती नगर ही झोपडपट्टी विमानतळ प्राधिकरणाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथील झोपड्या तोडून हा परिसर सुरक्षित झोन म्हणून करण्याचा निर्णय विमानतळ प्राधिकरणाकडून एक दशकांपूर्वी घेण्यात आला होता. (MMRDA)

संदेश नगर, आणि क्रांती नगर येथील झोपडीधारकांसाठी कुर्ला कोहिनुर येथे डीएचएलएफ या बांधकाम कंपनीकडून मोठ्या प्रमाणात इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. या इमारती मागील एक दशकापासून बांधून तयार आहे, मात्र झोपडीधारकांना सदनिका देण्यासाठी आता मुहूर्त मिळाला असून येथील झोपडीधारकांना पात्र अपात्र ठरवून सदनिकांचे वाटप काही दिवसांपूर्वी करण्यात आले आहे. कुर्ला बैलबाजार येथील संदेश नगर २११६ झोपड्यांपैकी, १०३१ झोपड्या पात्र ठरविण्यात आलेल्या असून १०७६ अपात्र ठरल्या आहे, ९ झोपड्या अनिर्णित आहेत. तर क्रांती नगर येथे १६३९ झोपड्या पैकी ८३४ झोपड्या पात्र ठरविण्यात आलेल्या असून ७१३ झोपड्या अपात्र ठरविण्यात आलेल्या असून ८४ झोपड्या अनिर्णित तर ८ रद्द करण्यात आलेल्या आहेत. (MMRDA)

(हेही वाचा – Ind vs Eng 5th Test : रोहित शर्माने क्षेत्ररक्षणात रचला ‘हा’ विक्रम)

बारा जणांना अटक

साकीनाका येथील गॅलेक्सी बैंक्वेट हॉलमध्ये २६ फेब्रुवारीपासून विमानपतन झोपडपट्टी पुर्नवसन योजनेंतर्गत काही पात्र झोपडीधारकांना एमएमआरडीकडून (MMRDA) ५७६ सदनिकेचे वितरणपत्र आणि चावीचे वाटप करण्यात आले होते. ४ मार्चला या कार्यक्रमांदरम्यान संबंधित एमएमआरडीए अधिकाऱ्यांना काही बोगस दस्तावेज सापडले होते. या दस्तावेजाच्या आधारे काही लोकांनी क्रांतीनगर आणि संदेशनगरातील झोपड्याचे बोगस खरेदी विक्रीचे व्यवहार केल्याचे दिसून आले. या कागदपत्रांवरुन संबंधित आरोपी मूळ झोपडीधारक असून त्यांना या पुर्नवर्सन योजनेर्तगत शासनाची सदनिका मिळणार होती. मात्र त्यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे शासनाची सदनिका मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले होते. (MMRDA)

त्यामुळे एमएमआरडीएच्या (MMRDA) वतीने साकीनाका पोलीस ठाण्यात संबंधित सर्व आरोपींविरुद्ध तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या आरोपीविरुद्ध १० कोटी सहा लाख रुपयांच्या ५३ सदनिका मिळविण्यासाठी बोगस दस्तावेज बनवून त्याचा वापर शासनाची फसवणुकीसाठी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत बारा जणांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या सर्वांना अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत ४७ हुन जणांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे एमएमआरडीएची (MMRDA) सदनिका मिळविण्याचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पोलिसांना संबंधित आरोपींविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले आहे. (MMRDA)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.