Sexual Assault : मशिदीमध्ये अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; ८० वर्षीय मौलवीला अटक

126
Sexual Assault : मशिदीमध्ये अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; ८० वर्षीय मौलवीला अटक
  • प्रतिनिधी 

रमजानच्या पाक महिन्यात दक्षिण मुंबईतील एका मशिदीत मौलवीकडून गैरकृत्य करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार बुधवारी समोर आला आहे. कुरान शरीफ शिकण्यासाठी मशिदीत येणाऱ्या एका अल्पवयीन मुलावर मशिदीत बांग देणाऱ्या ८० वर्षीय मौलवीने एकदा नव्हे तर दोन वेळा लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात ८० वर्षीय मौलवी विरोधात लैंगिक अत्याचार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – MSRTC च्या बस चालकाने प्रभादेवी ब्रिजवर तिघांना चिरडले; एकाचा मृत्यू)

दक्षिण मुंबईत राहणारा १४ वर्षांचा अल्पवयीन मुलगा रमजानचा महिना सुरू असल्याने त्याच परिसरातील एका मशिदीत कुराण शरीफ शिकण्यासाठी मागील काही आठवड्यांपासून जात होता. त्याच मशिदीत ८० वर्षीय मौलवी हा मशिदीत बांग देऊन कुरान शरीफ शिकवत होता. २६ फेब्रुवारी रोजी मौलवीने कुराण शिकण्यासाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलावर मशिदीत लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करण्याचा प्रयत्न केला.

(हेही वाचा – रेडी रेकनरची दरवाढ सरसकट नसेल; महसूलमंत्री Chandrashekhar Bawankule यांची विधान परिषदेत माहिती)

मौलवीने असाच प्रकार ६ मार्च रोजी दुसऱ्यांदा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुलाने कुरान शरीफ शिकण्यासाठी मशिदीत जाणे बंद केले. कुटुंबातील सदस्यांनी त्याला याबाबत विचारले असता त्याने मशिदीत घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी मुलाच्या कुटुंबीयांनी स्थानिक पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली असता पोलिसांनी ८० वर्षीय मौलवीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मौलवीचे वय बघता सहायक पोलिस आयुक्त यांचे विशेष अधिकार वापरून मौलवीला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने मौलवीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.