औरंगाबादमध्ये दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून एकाने आपल्या पत्नीसह अडीच वर्षांच्या मुलीची मोबाईल चार्जरच्या वायने गळा आवळून हत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. समीर मस्के असे या हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याने पत्नी आरती मस्के आणि मुलगी निशात मस्के यांनी हत्या केली.
( हेही वाचा : ट्रेनमध्ये सहज बदला तुमची सीट! स्लीपर कोचमधून एसीतही करता येईल प्रवास, जाणून घ्या रेल्वेचे नियम )
औरंगाबादमध्ये समीर मस्के आपली पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलीसह राहत होता. तो आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. यावरून त्यांच्यात अनेकदा वाद झाले होते. दरम्यान रविवारी रात्री त्यांच्यात पुन्हा वाद झाला. समीर मस्के याने घरातील दोरी आणि मोबाईलच्या वायरने पत्नी आरती आणि मुलगी निशात यांची गळात दाबून हत्या केली.
औरंगाबादच्या सातारा पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगबादच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर आरोपी समीर मस्के याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी समीरच्या आईवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community