औरंगाबादमध्ये सहायक पोलीस आयुक्ताने महिलेशी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस अधिकाऱ्याने हे कृत्य केल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादमधीस सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेच्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासण्यात आले आहे. यामध्ये पोलीस अधिकारी विशाल ढुमे हे महिलेच्या पतीला मारत असल्याचे दृश्य दिसत आहे.
( हेही वाचा : लहान बाळाच्या मेंदूचा दोन वर्षापर्यंत होतो सर्वाधिक विकास; काय काळजी घ्यावी?)
औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार विशाल ढुमे हे रात्रपाळीवर होते आणि एका हॉटेलमध्ये दारु पिण्यासाठी गेले होते यावेळी त्यांचा मित्रही पत्नीसमवेत आला होता. याचवेळी गाडी नसल्याने लिफ्ट मिळेल का अशी विनंती विशाल ढुमे यांनी मित्राला केली. मित्र त्याच्या पत्नीसह पुढच्या सीटवर बसला. याचवेळी दारुच्या नशेत ढुमे यांनी महिलेशी छेडछाड करायला सुरूवात केली. पुढे तुमच्या घरातील बेडरुमचे वॉशरुम वापरायला द्या असे सांगितले यानंतर महिलेशी गैरवर्तन करत तिच्या पतीला मारहाण केल्याचा आरोप ढुमे यांच्यावर करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community