अयोध्येतील राममंदिरावर (Ayodhya Ram Mandir) हल्ला करण्याच्या उद्देशाने रेकी करणाऱ्या आणि तेथील सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित महत्त्वाची माहिती पाकिस्तानी गुप्तहेर संघटना असलेल्या आयएसआयला (ISI) देणाऱ्या अब्दुल रहमानला (वय १९ वर्षे) फरीदाबाद येथून अटक करण्यात आली आहे. राममंदिरावर हँडग्रेनेडने हल्ला करुन मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा उद्देश होता. गुजरात दहशतवादविरोधी पथक (Gujarat Anti-Terrorism Squad, एटीएस) आणि फरीदाबाद स्पेशल टास्क फोर्स (Faridabad Special Task Force, एसटीएफ) यांनी संयुक्तरित्या हा कट उधळून लावला. ही कारवाई करण्यात गुजरात एटीएसची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. एटीएसला एक संशयित दहशतवादी भारतात सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुजरात एटीएस आणि फरिदाबाद एसटीएसने सापळा रचून संशयिताला अटक केली.
(हेही वाचा – Abu Azmi यांचे संतापजनक विधान; म्हणे, औरंगजेब हा उत्तम प्रशासक)
असा रचला सापळा
अब्दुल रहमान (Abdul Rehman) फैजाबादहून रेल्वेने फरीदाबादला पोहोचला होता, तिथे एका हँडलरने त्याला हँडग्रेनेड दिले. रेल्वेने अयोध्येला परतायचे आणि तिथे हल्ला करायची योजना होती. मात्र त्याआधीच सुरक्षा यंत्रणांना याविषयी माहिती मिळाली आणि गुजरात एटीएस आणि फरिदाबाद एसटीएफने संयुक्त कारवाई करत रविवार, २ मार्च या दिवशी अब्दुल रहमानला पकडले. सध्या हरियाणा पोलीस आणि केंद्रीय यंत्रणा अब्दुल रहमानची कसून चौकशी करत आहेत. त्याच्याकडील मोबाईल आणि इतर जप्त केलेल्या साहित्याची तपासणी केली जात आहे. या कटात आणखी कोण सामील होते आणि स्थानिक मदतनीसही त्यात सामील होते का, याचाही तपास आता सुरक्षा यंत्रणा करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल रहमान हा उत्तर प्रदेशातील फैजाबाद (अयोध्या) येथील रहिवासी आहे. त्याला फरीदाबाद येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दोन हातबॉम्बही जप्त करण्यात आले आहेत. अब्दुल रहमान हा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होता आणि अयोध्येतील राम मंदिरावर हल्ला करण्याचा कट आखत होता. रेहमान अनेक कट्टरवादी गटांशी संबंधित असून, फैजाबादमध्ये मटणाचे दुकान चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे.
गेल्या वर्षी अयोध्येत रामजन्मभूमीवर रामलल्लाचे मंदिर उभारल्यानंतर आयएसआयने भारतात मोठा दहशतवादी कट (Terrorist Attack) रचण्याची योजना आखली आहे. या हल्ल्याचा एक भाग म्हणून अब्दुल रहमानने यापूर्वीही अनेक वेळा अयोध्येतील राममंदिराची रेकी केली होती आणि तेथील सुरक्षाव्यवस्थेशी संबंधित महत्त्वाची माहिती आयएसआयला दिली होती, असेही तपासात समोर आले आहे. (Ayodhya Ram Mandir)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community