मुलगी न सांगता घराबाहेर गेली, वडिलांनी थेट गोळीच घातली! दिल्लीतील धक्कादायक घटना

राजधानी दिल्लीतील मथुरा येथे झालेल्या एका 22 वर्षीय तरुणीच्या हत्येमुळे खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या वडिलांनीच आपल्या मुलीला गोळी घालून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरुन मथुरा येथे फेकून दिला होता. या प्रकरणी आता पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांना अटक केली आहे.

अशी केली हत्या

दिल्लीच्या बदरपूर परिसरात राहणारी आयुषी यादव ही 22 वर्षीय तरुणी घरातून न सांगता बाहेर गेली होती. 17 नोव्हेंबरला जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा तिचे वडील नितेश यादव यांनी आयुषीला जाब विचारला असता त्यांच्यात वाद झाला. या वादातून संतापलेल्या वडिलांनी गोळी झाडून आपल्याच मुलीची हत्या केली. त्यानंतर त्यांनी आयुषीचा मृतदेह एका लाल सुटकेसमध्ये भरुन, ती बॅग यमुना एक्सप्रेस वेच्या सर्व्हिस रोडवरील राया परिसरात फेकून दिली. पोलिसांच्या तपासात ही माहिती समोर आली आहे.

(हेही वाचाः Navale Bridge Accident: ट्रकचे ब्रेक फेल झाले होते का? पोलिसांच्या तपासात झाला खुलासा)

ऑनर किलिंगचे प्रकरण

यासोबतच आयुषीने घरातल्यांना न सांगताच दुस-या जातीतील मुलाशी विवाह केल्यामुळे हे प्रकरण ऑनर किलिंगचे असल्याचेही पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तब्बल 20 हजार मोबाईल फोन ट्रेस केले होते. तसेच विविध मार्गांवरील 210 सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना आयुषीच्या हत्येत तिच्या घरच्यांचा सहभाग असल्याचा संशय आला. त्यानंतर पोलिसांनी आयुषीच्या आई-वडिलांची सखोल चौकशी केली असता हत्येमागील वास्तव समोर आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here