Baba Siddique यांच्या हत्येच्या दोन दिवसांनी घटनास्थळी सापडली हल्लेखोरांची बॅग

255
Baba Siddique यांच्या हत्येच्या दोन दिवसांनी घटनास्थळी सापडली हल्लेखोरांची बॅग
Baba Siddique यांच्या हत्येच्या दोन दिवसांनी घटनास्थळी सापडली हल्लेखोरांची बॅग

माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येच्या ६० तासानंतर घटनास्थळाच्या १०० मीटर परिसरात हल्लेखोरांपैकी एकाची बॅग मिळून आली आहे. या बॅगेत पोलिसांना ७.६२ ‘एमएम’ची पिस्तुल जिवंत काडतुसानी भरलेली मॅगझीन आणि काही संशयास्पद कागदपत्रे आढळून आलेत. गुन्हे शाखेने ही बॅग वस्तूसह ताब्यात घेतली असून ही बॅग मुख्य हल्लेखोर शिवकुमार गौतम हा फेकून फरार झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Baba Siddique)

माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती, याप्रकरणी धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंग या दोघांना घटनास्थळी पोलिसांनी अटक केली होती. या दोघीजवळून पोलिसांनी दोन पिस्तुल चार मॅगझीन आणि २८ जिवंत काडतुसे जप्त केली होती. या हल्लेखोरांपैकी शिवकुमार गौतम हा मुख्य हल्लेखोर पळून जाण्यास यशस्वी ठरला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबा सिद्दीकी यांच्यावर पॉईंट ९ एमएम पिस्तुलने गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, हा गोळीबार शिवकुमार याने केला होता. (Baba Siddique)

मुंबई गुन्हे शाखेकडून घटना घडली त्या दिवसापासून हल्लेखोराच्या विरोधात पुरावे शोध घेण्यासाठी घटनास्थळ आणि घटनास्थळाचा दीडशे मीटर परिघात शोध सुरू असताना घटनास्थळापासून १०० मीटर अंतरावर पोलिसांना एक बॅग बेवारसरित्या आढळून आली, पोलिसांनी बॅग उघडून बघितली असता बॅगेत पोलिसांना ७.६२ एमएमची पिस्तुल जिवंत काडतुसानी भरलेली मॅगझीन आणि काही संशयास्पद कागदपत्रे आढळून आली आहे. गुन्हे शाखेने ही बॅग वस्तूसह ताब्यात घेतली असून ही बॅग मुख्य हल्लेखोर शिवकुमार गौतम हा फेकून फरार झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. गुन्हे शाखेने बॅग ताब्यात घेऊन त्यातील पिस्तुल तपासणीसाठी फॉरेन्सिक विभागाकडे पाठविण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली. (Baba Siddique)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.