Baba Siddique हत्या प्रकरण: डायरीतून मोठे राजकीय नाव उघड

182
Baba Siddique हत्या प्रकरण: डायरीतून मोठे राजकीय नाव उघड
Baba Siddique हत्या प्रकरण: डायरीतून मोठे राजकीय नाव उघड

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. आरोपींनी हत्या करण्यामागील कारण स्पष्ट केले असून, दुसरीकडे बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांचा मुलगा झिशान सिद्दीकीने (Zeeshan Siddique) मुंबई पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमधून एका डायरीचा उल्लेख केला आहे. या डायरीत काही बिल्डर आणि राजकीय नेत्यांची नावे असल्याचा दावा करण्यात आला आहे.

झिशान सिद्दीकी यांनी आपल्या निवेदनात बिश्नोई गँगचा उल्लेख केला नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण, बिश्नोई गँगने हत्येची जबाबदारी उघडपणे स्वीकारली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी या प्रकरणात ४५०० पानी आरोपपत्र सादर केले असून २६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अनमोल बिश्नोईला (Anmol Bishnoi) फरार घोषित करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Juvenile Offenders : अल्पवयीन गुन्हेगारांचे वय १४ वर्षे होणार ?; अजित पवार यांची माहिती)

झिशान यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) आणि भाजपा नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांची नावे घेतली आहेत. विशेष म्हणजे, झिशान यांनी SRA प्रकल्प अँगलने तपासाची मागणी केली आहे. त्यांच्या मते, बाबा सिद्दीकी (Baba Siddique) हे एसआरए प्रकल्पात होत असलेल्या घडामोडींवर लक्ष ठेवून होते. झिशानच्या दाव्यानुसार, हत्या होण्याच्या दिवशी संध्याकाळी बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांचे मोहित कंबोज यांच्यासोबत व्हॉट्सअॅपवर संभाषण झाले होते.

बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येनंतर दोन दिवसांनी विधान परिषदेसाठी नेत्यांनी शपथ घेतली होती. झिशान यांनी याप्रकरणी तपासावर असमाधान व्यक्त केले असून, मोठ्या राजकीय व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत. आता या प्रकरणावर पुढील काळात काय नवे आरोप-प्रत्यारोप होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.