Baba Siddique Murder Case : शुभु लोणकरच्या भावाला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

131
Baba Siddique Murder Case : शुभु लोणकरच्या भावाला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
  • प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने पुण्यात प्रवीण लोणकर याला शनिवारी अटक केली आहे. प्रवीण लोणकर हा हत्येसंदर्भात फेसबुकवर पोस्ट टाकणाऱ्या शुभु लोणकरचा भाऊ असून शुभु आणि प्रवीण यांनी सिद्दीकीच्या हत्येसाठी धर्मराज कश्यप आणि शिवा गौतम यांची निवड केली होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमवारी प्रवीण लोणकर याला किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होत्र न्यायालयाने प्रवीण याला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Baba Siddique Murder Case)

माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर शुबु लोणकर महाराष्ट्र या फेसबुक पेजवर एक पोस्ट टाकण्यात आली होती. या पोस्टमध्ये बाबा सिद्दीकीच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोईने स्वीकारल्याचे स्पष्ट करण्यात आले होते, तसेच या पोस्टमध्ये बॉलिवूड कलाकार सलमान खान आणि दाऊदचा उल्लेख करण्यात आला होता. शुभु लोणकर हा पुण्यात राहणारा असून लॉरेन्स बिष्णोई गँगचा सदस्य असल्याचे बोलले जात आहे. (Baba Siddique Murder Case)

(हेही वाचा – Baba Siddique murder प्रकरण शरद पवारांच्या प्रतिक्रियेवर देवेंद्र फडणवीस संतापले; म्हणाले…)

शनिवारी रात्री बाबा सिद्दीकीची करण्यात आली होती, या हत्येप्रकरणात धर्मराज आणि गुरमेर सिंग या दोघांना जागेवर अटक करण्यात आली होती. तर शिवराज गौतम आणि मोहम्मद झिशान अख्तर हे दोन जण फरार झाले आहे. या हत्येनंतर दुसऱ्याचा दिवशी शुभु लोणकर महाराष्ट्र या फेसबुक पेजवर एक पोस्ट टाकण्यात आली होती, त्यात लॉरेन्स बिष्णोईचा उल्लेख करून या हत्येची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती, तसेच पोस्टमध्ये सलमान खान आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा उल्लेख करण्यात आला होता. (Baba Siddique Murder Case)

फेसबुक पोस्ट करणारा शुभु लोणकर याला यापूर्वी शस्त्रतस्करी प्रकरणात अटक करण्यात होती. शुभु हा लॉरेन्स बिष्णोई टोळीचा सदस्य असल्याचे समोर आले होते. शुभु हा पुण्यात राहणारा असू शकते त्याचा भंगारचा व्यवसाय आहे, त्याने धर्मराज आणि शिवराज याना पुण्यात आश्रय दिल्याचे समोर आले. तसेच त्यानेच या हत्याची योजना आखली होती अशी माहिती समोर आली. गुन्हे शाखेचे पथक शुभुला अटक करण्यासाठी पुण्यात दाखल झाले असता शुभु हा फरार झाला आहे. शुभुच्या कृत्याची खबर भाऊ प्रवीण लोणकर होती, त्यानेही त्यांना साथ दिल्याच्या संशयावरून गुन्हे शाखेने प्रवीण लोणकर याला ताब्यात घेऊन मुंबईत आणून त्याला अटक करण्यात आली. सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तप्रवीण लोणकरला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Baba Siddique Murder Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.