माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडून सुरू आहे. यामध्ये मुंबई गुन्हे शाखा लवकरच एकूण २६ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत आहे. ज्यामध्ये शुभम लोणकर, झिशान अख्तर आणि लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई अशी तीन आरोपींना फरार घोषित करण्यात येणार आहे. मुंबई गुन्हे शाखेला हत्येमागील कारणाबाबत अद्याप ठोस काहीही सापडलं नसल्याचा दावाही केला जात आहे. मुंबई गुन्हे शाखेने एसआरए वादाच्या अँगलनेही तपास केला परंतु पोलिसांना असं काही सापडलेलं नाही. (Baba Siddique Murder)
(हेही वाचा – Jammu – Kashmir मध्ये बर्फवृष्टी; ६८ पर्यटकांची लष्कराने केली सुटका)
बाबा सिद्दीकी हे अभिनेता सलमान खानच्या जवळचे होते. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना हत्येमागचं नेमकं कारण माहीत नाही. त्यांना फक्त हत्या करा इतकंच सांगण्यात आलं होतं. तसेच त्या बदल्यात पैसे मिळतील असंही सांगितलं होतं. या प्रकरणातील फरार आरोपी शुभम लोणकर आणि झिशान अख्तर यांना अटक होईपर्यंत हत्येमागचं नेमकं कारण समोर येणार नसल्याचं म्हटलं जात आहे. (Baba Siddique Murder)
(हेही वाचा – ‘सूर्यकिरण’ या भारत-नेपाळ संयुक्त लष्करी सरावासाठी Indian Army चे पथक रवाना)
सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी रात्री वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे नेते त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ उपस्थित असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्याच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने घेतली होती. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अनेकांना अटक केली आहे. यामध्ये आकाशदीप नावाच्या आरोपीला पंजाबमधील फाजिल्का येथून अटक करण्यात आली होती. अटक आरोपी आकाशदीप गिलने अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या चौकशी दरम्यान गिलने बाबा सिद्दीकी हत्याकांडातील गँगस्टर लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या थेट संपर्कात असल्याचे उघड केले. (Baba Siddique Murder)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community