Baba Siddique Murder : मुंबईत पुन्हा गॅंगवॉर, दाऊद टोळी पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

272
Baba Siddique यांच्या हत्येसाठी झारखंड राज्यात करण्यात आला होता गोळीबाराचा सराव
  • प्रतिनिधी

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबईत पुन्हा एकदा गॅंगवॉरला सुरुवात होते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. मुंबई पोलिसांनी संपवलेली गॅंगवॉर पुन्हा भडक्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई शहरात अनेक वर्षांनंतर बाबा सिद्दीकी यांच्यासारख्या राजकीय आणि मातब्बर नेत्याची भरचौकात गोळीबार करून हत्या करण्यात आली. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करून लॉरेन्स बिश्नोई टोळीने मुंबईत आपले पाय रोवले आहे. त्यामुळे एकेकाळी मुंबईत दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्यादेखील सतर्क झाल्या असून त्यात दाऊद टोळीचे नाव अग्रस्थानी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Baba Siddique Murder)

मुंबईत ८० आणि ९० च्या दशकात अनेक गुन्हेगारी टोळ्यांनी मुंबईत आपली दहशत निर्माण केली होती. त्यात करीम लाला पासून वरदा राजन, दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अरुण गवळी, अमर नाईक, सुरेश मंचेकर, गुरू साटम, मन्या सुर्वे इत्यादी टोळ्यांचा समावेश होता. या टोळ्यांनी तस्करीच्या धंद्यापासून अंमली पदार्थाच्या तस्करीतून आपल्या टोळ्या तयार केल्या. त्यानंतर खंडणी, सुपाऱ्या वाजवून या टोळ्यांनी मुंबईत गुन्हेगारीला सुरुवात केली. मुंबईत ९०च्या काळात गॅंगवॉर गाजले होते, अनेक टोळ्यांनी प्रतिस्पर्धी टोळ्यांवर हल्ले करून टोळीतील गुंडांना संपविण्याचा विडा उचलला होता. (Baba Siddique Murder)

(हेही वाचा – Reliance-Hotstar Merger : रिलायन्स-हॉटस्टार विलीनीकरणानंतर जिओ सिनेमा बंद होणार?)

अखेर मुंबई पोलिसांनी या टोळ्यांना नियंत्रित ठेवण्यासाठी गुंडाचे ‘एन्काऊंटर’ सुरू केले. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ९०च्या काळात अनेक गुंडांचा एन्काऊंटर करून मुंबईतील गॅंगवॉर संपवले. एन्काऊंटरच्या भीतीने अनेक गुंड भारताबाहेर पळून गेले. त्यापैकी दाऊद, छोटा राजन, यांसारखे टोळी प्रमुख परदेशातून आपली टोळी चालवत होते. दाऊद, राजन, आणि इतर टोळ्यांचे गुंड सध्या तुरुंगात गुन्ह्यांची शिक्षा भोगत आहे. दोन दशकानंतर मुंबई पुन्हा चर्चेत आली ती बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणामुळे. या दोन्ही गुन्ह्यात नवीन उदयास आलेली लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव समोर आले आहे. (Baba Siddique Murder)

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर या टोळीची मुंबईत वाढती दहशत बघून मुंबईत पुन्हा गॅंगवॉर पेटणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. सिद्दीकी याच्या हत्येनंतर दाऊद टोळीकडून या हत्येचा सूड घेतला जाईल अशी चर्चा मुंबईत सुरू आहे. मुंबईत आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी दाऊद टोळी मुंबईत पुन्हा सक्रिय होऊ शकते अशीही शक्यता सूत्राकडून वर्तविण्यात येत आहे. दाऊद टोळीकडून बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे कारण पुढे करून लॉरेन्स टोळीकडून सुरक्षा म्हणून ‘प्रोटेक्शन मनी’च्या नावाखाली दाऊद टोळीच्या गुंडाकडून बॉलिवूड निर्माते, विकासक आणि उद्योगपतींकडून खंडणी वसूल केली जाऊ शकते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. (Baba Siddique Murder)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.