Baba Siddique Murder : पोलिसांनी मारेकऱ्यालाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’

54
Baba Siddique Murder : पोलिसांनी मारेकऱ्यालाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’
Baba Siddique Murder : पोलिसांनी मारेकऱ्यालाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसंदर्भात अनेक नवनवीन धक्कादायक बाबी समोर येत आहेत. यामध्ये हत्येनंतर शूटर शिवकुमार गौतम उर्फ शिवा घटनास्थळावरून पळाला. त्यानंतर हल्ला यशस्वी झाला की नाही, हे पाहण्यासाठी पुन्हा घटनास्थळ गाठून बघ्यांच्या गर्दीत तो उभा राहिला. तिथे पोलिसांनी त्याच्याकडे शूटर्सना पाहिले का, अशी विचारणाही केल्याचे आता चौकशीत समोर आले आहे. (Baba Siddique Murder)

(हेही वाचा – स्वतःचा पक्ष काढणारे Sharad Pawar दुसऱ्यांना गद्दार म्हणत आहेत; संभाजीराजे छत्रपती यांचा टोला)

गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने शिवाला अटक केली आहे. शिवाच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. शिवाने सिद्दीकी यांच्यावर केलेल्या गोळीबारानंतर घटनास्थळावरून पळ काढला. पुढे जाऊन बॅगेत आणलेले अतिरिक्त शर्ट बदलून पिस्तूल, शर्ट बॅगेत भरून ते हल्ला केल्याच्या ठिकाणापासून १०० मीटर अंतरावर उभ्या असलेल्या कारजवळ फेकून दिली. तेथून शिवाने लीलावती रुग्णालय गाठले. तिथे त्याने रुग्णालयाबाहेर सिद्दिकी यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली. तेथून शिवा परत घटनास्थळी आला. तेथे पोलिसांनी धर्मराज कश्यप आणि गुरुमेल सिंग या दोन साथीदारांना पकडल्याचे त्याने पाहिले. तिथेच गर्दीत थांबून तो सगळ्या घडामोडींचा आढावा घेत होता, असे अनेक धक्कादायक खुलासे शिवाने केले आहेत.

घटनास्थळानंतर शिवा कुर्ल्याला आला. तेथून ठाणे मार्गे पुणे गाठले. शिवकुमारने वाटेत फोन फेकून दिला. पुण्याहून झाशी आणि लखनऊमार्गे बहराईचला पोहोचला. प्रवासातील अनोळखी व्यक्तीचे फोन विचारून सहकाऱ्यांशी आणि हँडलर्सशी बोलत असल्याचे पोलिसांना सांगितले.

पोलिस घटनास्थळी जमलेल्या गर्दीत प्रत्येकाकडे चौकशी करत होते. त्यात त्यांनी शिवालाही कोणाला पाहिले किंवा कसे, अशी विचारणा केली. त्यावर त्याने कोणालाही पाहिले नसल्याचे सांगितले. घटनेच्या दोन दिवसांनी गुन्हे शाखेला शिवाने फेकलेली बॅग सापडली. (Baba Siddique Murder)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.