Baba Siddique गोळीबाराचं कनेक्शन लॉरेन्स बिष्णोई गँगशी? १५ दिवसांपूर्वी धमकी आणि…

241
Baba Siddique गोळीबाराचं कनेक्शन लॉरेन्स बिष्णोई गँगशी? १५ दिवसांपूर्वी धमकी आणि...
Baba Siddique गोळीबाराचं कनेक्शन लॉरेन्स बिष्णोई गँगशी? १५ दिवसांपूर्वी धमकी आणि...

अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique Shot Dead) यांच्यावर शनिवारी रात्री वांद्रे परिसरातील खेरवाडी जंक्शनजवळ गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. बाबा सिद्दिकी (Baba Siddique) हे त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddiqui) यांच्या कार्यालयातून निघत असताना त्यांच्यावर हल्ला झाला.

बाबा सिद्दिकींना जीवे मारण्याची धमकी
बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांनी तोंडावर रुमाल बांधले होते. तीनपैकी दोन हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. बाबा सिद्दिकी यांना 15 दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर बाबा सिद्दिकी यांना पोलिसांकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. त्यानुसार बाबा सिद्दिकी यांच्यासोबत एक पोलीस कॉन्स्टेबल तैनात असायचा. मात्र, गोळीबारावेळी हा पोलीस कर्मचारी कुठे होता आणि नेमके काय घडले, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे पोलिसांना गोळीबाराचं कनेक्शन लॉरेन्स बिष्णोई गँगशी असल्याचा संशय आहे. पोलिसांनी लॉरेन्स बिष्णोई अँगलने तपास सुरू केल्याचे समजते आहे. (Baba Siddique)

नेमकं काय घडलं?
बाबा सिद्दीकी शनिवारी संध्याकाळी त्यांच्या वांद्रे येथील निर्मल नगरमधील ऑफिसमध्ये बसले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दीकीही होते. फटाके फोडून बाबा सिद्दीकी घरी जाणार होते. विजयादशमी असल्याने या परिसरातून देवीच्या मिरवणुका जात होत्या. त्यामुळे या परिसरात वाद्यांचा आणि फटाक्यांचा आवाज होता. त्यामुळे ते सव्वा नऊ ते साडेनऊच्या सुमारास ऑफिसमधून बाहेर पडले. फटाके वाजवत असतानाच एक गाडी आली आणि त्यातून तिघे उतरले. (Baba Siddique Shot Dead) या तिघांनी तोंडाला रुमाल बांधलेला होता. गाडीतून उतरताच फटाक्याच्या आवाजात त्यांनी सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. एकूण पाच राऊंड फायर कण्यात आले. त्यातील एक गोळी बाबा सिद्दीकी यांच्या छातीवर लागली. त्यामुळे ते खाली कोसळले. आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ धाव घेऊन बाबा सिद्दीकी यांना रुग्णालयात नेले. पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. (Baba Siddique Shot Dead)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.