Badlapur प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले? राज ठाकरेंचा संतप्त सवाल

209
Badlapur प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले? राज ठाकरेंचा संतप्त सवाल
Badlapur प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले? राज ठाकरेंचा संतप्त सवाल

बदलापूर (Badlapur) पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर पालकांचा उद्रेक झाला आहे. संतापलेल्या पालकांनी आज शाळेबाहेर जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. तर संतप्त जमाव बदलापूर रेल्वे ट्रॅकवर उतरला आहे. आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या, अशी एकच मागणी नागरिकांनी लावून धरली आहे. या संपूर्ण घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.

राज ठाकरेंची पोस्ट काय?
“बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी 12 तास का लावले ? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या.” असं राज ठाकरे म्हणाले आहेत. (Badlapur)

काय आहे प्रकरण?
बदलापूर शहरातील एका नमांकित शाळेत तीन वर्ष आठ महिने आणि सहा वर्ष वय असलेल्या दोन लैंगिक मुलींवर शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची तक्रार नोंदवण्यास विलंब झाल्यानंतर शाळेतील पालकांच्या संतापाचा उद्रेक झाला. याबाबत पालकांसोबत सर्वसामान्य जनताही रस्त्यावर उतरली. आधी सकाळी शाळेसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली, त्याच वेळी आंदोलक रेल्वे स्थानकावर पोहोचले आणि ट्रॅकवर उतरले. त्यामुळे सकाळपासूनच लोकलचा खोळंबा झाला. (Badlapur)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.