Badlapur Case: शाळेचे अध्यक्ष, सचिव अखेर अटकेत! ४४ दिवसांनी आरोपींना बेड्या

154
Badlapur Case: शाळेचे अध्यक्ष, सचिव अखेर अटकेत! ४४ दिवसांनी आरोपींना बेड्या
Badlapur Case: शाळेचे अध्यक्ष, सचिव अखेर अटकेत! ४४ दिवसांनी आरोपींना बेड्या

बदलापूरच्या शाळेत (Badlapur Case) 12 आणि 13 ऑगस्टला दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. त्यानंतर बदलापूरच्या नागरिकांनी घटनेच्या विरोधात रोष व्यक्त करत रेल्वे वाहतूक ठप्प केली होती. संबंधित प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारला घ्यावी लागली होती. या प्रकरणातील सहआरोपी संबंधित शाळेचे ट्रस्टी तुषार आपटे आणि उदय कोतवाल हे फरार होते. अखेर त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

(हेही वाचा-पंतप्रधानांना मिळालेल्या स्मृतिचिन्हांच्‍या E-Auction साठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ)

या प्रकरणातील (Badlapur Case) मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याच्या एन्काऊंटर नंतर विरोधकांनी या दोन्ही आरोपींवरुन विरोधकांवर निशाणा साधला होता. हे दोन्ही आरोपी फरार असल्याने विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली होती. अखेर दीड महिन्यांनी या आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या आरोपींना तपास करणाऱ्या पोलिसांच्या एसआयटी टीमने ताब्यात घेतलं आहे. हे दोन्ही आरोपी शाळेचे संस्थाचालक आणि सचिव आहेत.

(हेही वाचा-Drugs : दिल्लीत तब्बल 2 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त; पोलिसांनी हस्तगत केली 560 किलो कोकेन)

दोन्ही आरोपींचा शोध एसआयटी, ठाणे क्राईम आणि भिवंडी गुन्हे शाखेचं पथक घेत होतं. पण ते सापडत नव्हते. दुसरीकडे या दोन्ही आरोपींच्या बाजूने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. पण न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यांनी उच्च न्यायालयातही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण उच्च न्यायालयानेदेखील त्यांची मागणी केली नाही. या दरम्यान, त्यांना अखेर पोलिसांनी अटक केली. त्यांची आता चौकशी सुरु आहे. (Badlapur Case)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.