Badlapur School Case : बदलापूर आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू, विविध पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल

Badlapur School Case : आंदोलनकर्त्यांना न्यायालयीन कोठडी

174
Badlapur School Case : बदलापूर आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू, विविध पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल
Badlapur School Case : बदलापूर आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू, विविध पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल
बदलापूर आंदोलन प्रकरणी ५०० पेक्षा अधिक आंदोलकाविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सरकारी कामात अडथळा आणणे, दंगल घडविणे, चिथावणी देणे या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले असून जवळपास ५० पेक्षा अधिक आंदोलनकर्त्याना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तसेच गुन्हे दाखल झालेल्या महिला आंदोलकाना नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. या सर्व आंदोलकांना कल्याण आणि उल्हासनगरच्या चोपडा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Badlapur School Case)
बदलापूर येथील आदर्श विद्यालयात दोन चिमुरड्या विद्यार्थिनीवर झालेल्या लैगिंग अत्याचार, त्याच बरोबर बदलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास केलेला विलंब प्रकरणी  संतप्त बदलापूरकरांनी मंगळवारी बदलापूर रेल्वे स्थानक, बदलापूर पूर्व -पश्चिम आणि शाळेच्या आवारात आंदोलन केले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागून आंदोलन कर्त्यानी शाळेची तसेच वाहनांची तोडफोड केली होती. (Badlapur School Case)
तब्बल १० तास सुरू असलेल्या या आंदोलनानंतर अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडून लावत आंदोलन कर्त्याची धरपकड करण्यात आली. दरम्यान सोमवारी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे, बदलापूर पोलीस ठाणे आणि कुळगाव बदलापूर पोलीस ठाण्यात ५०० पेक्षा अधिक आंदोलनकर्त्या विरुद्ध ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. भारतीय न्याय संहिता नुसार सरकारी कामात अडथळा आणणे, दंगल घडविणे, चिथावणी देणे या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले असून जवळपास ५० पेक्षा अधिक आंदोलनकर्त्याना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या आंदोलनकर्त्याना मंगळवारी उल्हासनगर येथील चोपडा न्यायालय आणि कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या सर्वांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Badlapur School Case)
आंदोलन कर्त्यामध्ये महिला आंदोलन कर्त्याची मोठी संख्या होती, ताब्यात घेण्यात आलेल्या महिला आंदोलन कर्त्याना अटक न करता त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे, वृत्तवाहिन्याचे फुटेज तसेच आंदोलनाचे  व्हायरल व्हिडीओचे फुटेज ताब्यात घेऊन आंदोलन कर्त्यांची ओळख पटवून त्यांची धरपकड सुरू करण्यात आली असल्याची माहिती एका पोलीस अधिकारी यांनी दिली आहे. (Badlapur School Case)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.