Badlapur Sexual Abuse Case : विकृत आरोपी अक्षय शिंदेची काय आहे पार्श्वभूमी?

367
Badlapur Sexual Abuse Case : विकृत आरोपी अक्षय शिंदेची काय आहे पार्श्वभूमी?
Badlapur Sexual Abuse Case : विकृत आरोपी अक्षय शिंदेची काय आहे पार्श्वभूमी?
बदलापूर येथील  लैगिंग अत्याचार  गुन्ह्यातील आरोपी  अक्षय शिंदे (Akshay Shinde) बाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अक्षय याची दोन लग्न झाले असून दोन्ही बायका त्याला सोडून गेल्या आहे, अक्षय हा विकृत प्रवृत्तीचा असून त्याच्या या विकृत प्रवृत्तीला कंटाळून दोन्ही बायका त्याला सोडून गेल्या आहेत. बायका सोडून गेल्यामुळे त्याने आपली भूक भागविण्यासाठी चिमुकल्यांना लक्ष्य केले होते, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरम्यान मंगळवारी झालेल्या आंदोलना दरम्यान काही आंदोलकांनी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड केली आहे. मुलाने   केलेल्या या घृणास्पद कृत्यामुळे कुटूंबियांना भीतीपोटी घर सोडावे लागले आहे. (Badlapur Sexual Abuse Case)
बदलापूर या ठिकाणी गेल्या आठवड्यात एका शाळेत घडलेल्या लैगिंग अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे, ४ वर्षाच्या दोन विद्यार्थीनीवर लैगिंग अत्याचार करणाऱ्या शाळेचा सफाई कर्मचारी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याला बदलापूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध पोस्को, बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शाळेत दोन चिमुरड्या विद्यार्थीनीवर शाळेत घडलेल्या या प्रसंगामुळे संपूर्ण बदलापूरातील संतप्त नागरिकांनी, पालकांनी मंगळवारी सकाळी आंदोलन करून १० तास रेलरोको केला होता. (Badlapur Sexual Abuse Case)
आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला शिक्षा देतो, किंवा आताच्या आता त्याला फासावर लटकवा असे आंदोलन कर्त्यांची मागणी होती. एवढे घृणास्पद कृत्य करणारा हा नराधम आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) आहे, तरी कोण त्याच्या बद्दल माहिती काढण्यात आली असता अक्षय शिंदे हा बदलापूर मधील एका गावात राहणारा असून तो विवाहित आहे, त्याची पहिली पत्नी सोडून गेल्यानंतर त्याने दुसरे लग्न केले, दुसरी पत्नी देखील त्याच्याजवळ नांदली नाही आणि काही महिन्यातच ती देखील अक्षयला सोडून गेली. दोन्ही पत्नीनी त्याला सोडायचे कारण म्हणजे त्याची विकृती, अक्षय हा विकृत प्रवृत्ती असून पत्नीसोबत विकृत चाळे करीत असल्यामुळे त्याच्या पत्नीनी त्याला सोडून दिले होते. सूत्रांच्या माहितीनुसार अक्षय शिंदे हा सतत मोबाईल मध्ये अश्लील व्हिडीओ डाउनलोड करून बघायचा, त्याच्या मोबाईल फोन मध्ये मोठ्या प्रमाणात अश्लील व्हिडीओ होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. हे व्हिडीओ बघून अक्षय विकृतचाळे करीत असल्यामुळे त्याच्या पत्नी त्याला सोडून गेल्या असाव्यात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Badlapur Sexual Abuse Case)
दरम्यान मंगळवारी झालेल्या आंदोलना दरम्यान काही आंदोलकांनी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड केली आहे. मुलाने केलेल्या या घृणास्पद कृत्यामुळे कुटूंबियांना भीतीपोटी घर सोडावे लागले आहे. (Badlapur Sexual Abuse Case)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.