कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे (Jharkhand) माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. झारखंड उच्च न्यायालयाने हा निर्णय आज (२८ जून) दिला आहे. जवळपास पाच महिन्यांनंतर तुरुंगात असलेल्या सोरेन (Hemant Soren) यांची आता सुटका होणार आहे.
(हेही वाचा – Kali Gandaki River Nepal : अयोध्येतील रामलल्लाचे आणि नेपाळमध्ये वाहणार्या काली गंडकी नदीचा आहे खास संबंध!)
काय आहे प्रकरण?
हेमंत सोरेन यांना ३१ जानेवारी २०२४ रोजी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. ८.३६ एकर जमिनीच्या बेकायदेशीर ताब्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगचे हे प्रकरण आहे. माजी मुख्यमंत्री सध्या रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. सोरेन (Hemant Soren) यांच्यावर अन्य कोणतेही खटले प्रलंबित नसल्यामुळे तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर झारखंड मुक्ति मोर्चा पक्षाचे निष्ठावंत आणि राज्य परिवहन मंत्री चंपाई सोरेन यांचे उत्तराधिकारी म्हणून नाव देण्यात आले होते. त्यानंतर चंपाई सोरेन (Hemant Soren) हे झारखंडचे मुख्यमंत्री झाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community