Balasore Train Accident : तीन रेल्वे अधिकाऱ्यांविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल  

141
Balasore Train Accident : तीन रेल्वे अधिकाऱ्यांविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल  
Balasore Train Accident : तीन रेल्वे अधिकाऱ्यांविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल  

बालासोर रेल्वे दुर्घटनेप्रकरणी (Balasore Train Accident) अटक करण्यात आलेल्या 3 रेल्वे अधिकाऱ्यांविरुद्ध सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. ओडीसा राज्यातील बालासोर येथे 2 जुलै रोजी रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठा अपघात घडला. यामध्ये अनेकांचा बळी गेला होता. या प्रकरणी वरिष्ठ विभाग अभियंता अरुण कुमार मोहंता, विभाग अभियंता मोहम्मद अमीर खान आणि तंत्रज्ज्ञ पप्पू कुमार यांना यापूर्वी सीआरपीसीच्या कलम 304 आणि 201 अंतर्गत अटक करण्यात आली होती. सदोष मनुष्यवध आणि पुरावे नष्ट करणे या कलमांखाली त्यांना अटक करण्यात आली होती. आता त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या रेल्वे अधिकार्‍यांवर भादंवि कलम 304(2), 201 सह कलम 34 आणि रेल्वे कायदा 1989 च्या कलम 153 अंतर्गत आरोप दाखल करण्यात आले आहेत.

(हेही वाचा – Worli Sea Link Accident : आमदार पुत्राच्या महागड्या मोटारीचा सी लिंक वर भीषण अपघात)

कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे आणि निष्काळजीपणामुळे भीषण अपघात

सिग्नल आणि दूरसंचार विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे आणि निष्काळजीपणामुळे 2 जून रोजी हा भीषण अपघात झाल्याचे रेल्वे अपघाताच्या तपासात समोर आले आहे. 2 जून रोजी ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार स्थानकावर कोरोमंडल एक्सप्रेसने स्टेशनच्या लूपलाइनवर उभ्या असलेल्या मालगाडीला धडक दिली. एकाच वेळी डाऊन मार्गावरून (हावडा बाजूने) जात असलेल्या बंगळुरू-हावडा एक्स्प्रेसचे शेवटचे २ डबे कोरोमंडल एक्स्प्रेसच्या रुळावरून घसरलेल्या डब्यांवर  आदळून उलटले होते. (Balasore Train Accident)

इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्यामुळे अपघात

2 जुन रोजी ओडिसातील बालासोर येथे झालेल्या या भीषण रेल्वे अपघातात 288 जणांचा बळी गेला होता, तर 1100 हून अधिक जण जखमी झाले होते. अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी चालू केल्याचे सांगितले होते. त्यांनी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा खुलासा रेल्वेमंत्र्यांनी केला होता. (Balasore Train Accident)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.