Bangalore Firecrackers : “फटाक्यावर बसला तर तुला रिक्षा घेऊन देऊ”; तरुणाने नशेत लावलेली पैज जीवावर बेतली

160
Bangalore Firecrackers : “फटाक्यावर बसला तर तुला रिक्षा घेऊन देऊ
Bangalore Firecrackers : “फटाक्यावर बसला तर तुला रिक्षा घेऊन देऊ"; तरुणाने नशेत लावलेली पैज जीवावर बेतली

कर्नाटकच्या बंगळुरूमधून (Bangalore in Karnataka) धक्कादायक बातमी समोर आली आहे. फटाके फोडताना काही तरुणांच्या पैजेमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. आरोपींनी तरुणासोबत पैज लावत त्याला फटाक्यांवर बसण्यास सांगितले होते. मात्र फटाक्याच्या स्फोटानंतर तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा सगळा धक्कादायक प्रकार एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Bangalore Firecrackers)

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सबरीश आणि त्याचे मित्र ३१ ऑक्टोबर रोजी फटाके फोडून दिवाळी साजरी करत होते. त्याआधी त्यांनी मद्यप्राशन केलं होतं. मद्यप्राशन केल्यानंतर सर्व मित्र फटाके फोडण्यासाठी बाहेर पडले. यावेळी एका मित्राने सबरीशशी पैज लावली. जर फटाक्याच्या बॉक्सवर बसलास तर तुला नवीकोरी ऑटोरिक्षा घेऊन देईल, अशी पैज लावली. सबरीशनंही हे आव्हान स्वीकारलं. या घटनेचा सीसीटीव्ही सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसत असल्यानुसार सबरीश एकटाच फटाक्याच्या बॉक्सवर बसलेला दिसत आहे. त्याच्या मित्रांनी फटाक्याची वात पेटवली आणि ते सर्व जण सुरक्षित अंतरावर जाऊन उभे राहिले. काही सेकंदात बॉक्सखाली ठेवलेला फटाका फुटतो आणि सबरीश रस्त्यावर कोसळताना दिसतो. फटाका फुटल्यानंतर त्याचे मित्र धावत त्याच्याजवळ येऊन पाहतात, तेव्हा तो जमिनीवर पडलेला आढळून येतो. यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयत दाखल करण्यात येते. फटाक्याच्या तीव्रतेमुळे अंतर्गत अवयवांना धक्का बसून त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. २ नोव्हेंबर रोजी सबरीशचा मृत्यू झाला.व्हिडीओही आता समोर आला आहे.

(हेही वाचा – उबाठाचे उमेदवार Sunil Raut यांना महिलेविषयीचे आक्षेपार्ह वक्तव्य भोवले; गुन्हा दाखल)

पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. तसेच मानवी मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.