बांगलादेशात (Bangladesh) दोन गटांत सरकारी नोकऱ्यांवरुन (Govt Jobs) हाणामारी झाली आहे. आरक्षण (Reservation) हा मुद्दा तिथेही चर्चेत आहे. आरक्षण या मुद्द्यावर झालेल्या या हाणामारीत अनेकजण जखमीही झाले आहेत. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण असे दोन मुद्दे महाराष्ट्रात चर्चेत आहेत. एकीकडे या गोष्टी राज्यात सुरु असताना तिकडे बांगलादेशात दोन गटांत सरकारी नोकऱ्यांवरुन हाणामारी झाली आहे.
पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या
आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ढाका येथील जहांगीर नगर विद्यापीठाबाहेर विद्यार्थी एकमेकांना भिडले. ही परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की शेवटी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या आणि ही गर्दी पांगवावी लागली. या सगळ्या झटापटीत आणि हाणामारीच्या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. (Bangladesh)
सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण हवं या मुद्द्यावरुन विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. सरकारच्या बाजूने असलेल्या विद्यार्थ्यांची संघटना आणि चळवळ करणाऱ्या विद्यार्थ्यांची संघटना असे विद्यार्थी जहांगीर नगर विद्यापीठाच्या बाहेर एकमेकांना भिडले. यामध्ये 12 विद्यार्थी जखमी झाले आहेत अशी माहिती बांगलादेश पोलिसांनी दिली. (Bangladesh)
नेमकी मागणी काय?
ज्यांनी बांगलादेश च्या १९७१ च्या स्वातंत्र्ययुद्धात योगदान दिलं आहे त्यांच्या कुटुंबातील मुलांना सरकारी नोकरी मिळाली पाहिजे अशी मागणी होते आहे. तसंच महिला, अपंग व्यक्ती आणि अल्पसंख्य या सगळ्यांना सरकारी नोकरीत आरक्षण मिळावं ही मागणी केली जाते आहे. २०१८ मध्ये या सगळ्याला स्थगिती देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा या सगळ्या वर्गांना आरक्षण दिलं जावं अशी मागणी होते आहे. याच मुद्द्यावरुन दोन गटांमध्ये हाणामारी झाली. (Bangladesh)
ज्येष्ठ नागरिकांच्या वंशजांसाठी ३० टक्के आरक्षण असावं अशीही मागणी करण्यात आली. बांगलादेश न्यायालयात हा मुद्दा पोहचला. बांगलादेश उच्च न्यायालयाने आरक्षणाच्या बाजूने निकाल दिला. मात्र आता अपंग आणि युद्धात जे शहीद झाले त्यांच्या वंशजांना ६ टक्के आररक्षण मिळावं ही मागणी होते आहे. हा मुद्दा ताजा असल्याने यावरुनच हाणामारी झाली. (Bangladesh)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community