Bangladesh infiltrators: चेंबूर माहुल गाव येथून 7 अवैध बांगलादेशींना अटक

430

भारतात अवैध्यरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचे (Bangladesh infiltrators) प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, नवीमुंबई, ठाणे यांसारख्या ठिकाणी बांगलादेशी नागरिक अवैध्यरित्या वास्तव्य करत आहेत. त्यामुळे या स्थलांतरीत बांगलादेशींना पकडण्याचे काम सध्या मुंबई पोलिसांनी सुरु केले आहे. अशातच मुंबईच्या चेंबूरमधील अवैधरित्या राहणाऱ्या सात बांगलादेशी नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. (Bangladesh infiltrators)

(हेही वाचा – International Film Festival : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांना राज्य शासनाचे पाठबळ)

मिळालेल्या माहितीनुसार सोहंग आशिर मुल्ला, जाहिदुल इस्लाम ईमुल, आलामीन शेख, सुमा जहीगीर आलम तुटूल, नोयम अफजल हुसेन शेख, तावमीना अख्तर राजू, सलमा मोकसद अली, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मुंबई उपनगरातील चेंबूर येथील माहूल गाव विभागात अवैध्यरित्या वास्तव्य करणाऱ्या सात बांगलादेशी नागरिकांना (Bangladeshi Citizen) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हे सर्वजण मार्च 2020 पासून माहूल (Chembur Mahul) गावात एकत्र राहत होते. यात 3 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. हे सर्वजण 25 ते 35 या वयोगटात असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या सात बांगलादेशी नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – राष्ट्रवादीसोबत घरोबा; Shiv Sena UBT ला पक्ष कार्यालचाही विसर?)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे बांगलादेशी नागरिक (Bangladeshi citizen) घुसखोरी करून मुंबईतील चेंबूर माहुल गाव (Mahul village) येथे भाडेतत्वावर बेकायदेशीर राहण्यास होते. यामधील आरोपी हे हॉटेलमध्ये वेटर आणि बार गर्ल म्हणून काम करीत होते, अशी माहिती समोर आली. तर दलालाच्या मदतीने त्यांनी भारतात बेकायदेशीर घुसखोरी (Bangladeshi illegal infiltration) केल्याची माहिती समोर येत आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.