Bangladesh हिंसाचारात आतापर्यंत ९१ जणांचा मृत्यू; संचारबंदी लागू

117
Bangladesh हिंसाचारात आतापर्यंत ९१ जणांचा मृत्यू; संचारबंदी लागू
Bangladesh हिंसाचारात आतापर्यंत ९१ जणांचा मृत्यू; संचारबंदी लागू

पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी काही नागरिकांनी आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार हे नागरिक या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ढाक्यातील सायन्स लॅब चौकात दाखल झाले होते. मात्र, यावेळी त्यांना अवामी लीग, छात्र लीग आणि जुबो लीगच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली. (Bangladesh)

(हेही वाचा –Artical 370 च्या अंताची 5 वर्षे; अखेर जम्मू – काश्मीर ‘मुक्त’ झाला)

त्यामुळे बांगलादेशमध्ये (Bangladesh) पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. या हिंसक घटनेत ९१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर बांगलादेशमध्ये अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लावण्यात आला असून इंटरनेटदेखील बंद करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे भारत सरकारनेही या घटनेनंतर बांगलादेशमधील भारतीय नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच येथील भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबरदेखील जारी करण्यात आला आहे.

(हेही वाचा –Love Jihad फोफावण्यामागे मुली, पालक आणि समाजही कारणीभूत)

काही आंदोलनकांनी ढाक्याच्या शाहबाग भागातील शेख मुजीब वैद्यकीय महाविद्यालयासह या भागातील काही कार्यालय आणि आस्थापनांवरही हल्ले केले. विशेष म्हणजे काही आंदोलक लाठ्या-काठ्या घेऊन शाहबाग चौकात जमले, तेव्हा पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. यावेळी पोलिसांना अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या घटनेनंतर आता बांगलादेशच्या (Bangladesh) गृहमंत्रालयाने देशात अनिश्चित काळासाठी कर्फ्यूची घोषणा केली आहे. बांगलादेशमधील भारतीय नागरिकांना कोणतीही मदत हवी असल्यास +88-01313076402 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन भारतीय दुतावासाकडून करण्यात आलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.