Bangladesh Youngster यांचा कल सौदी आणि कॅनडाकडे; बनावट कागदपत्रावर भारतीय पासपोर्ट बनवून देणाऱ्या एजंट टोळ्या सक्रिय

91
Bangladeshi तरुणांचा कल सौदी आणि कॅनडाकडे; एजंट टोळ्या सक्रिय
  • प्रतिनिधी 

बांगलादेशी तरुणांचे (Bangladesh Youngster) बोगस कागदपत्रे तयार करून त्यांना भारतीय नागरिक बनवून परदेशात पाठविणाऱ्या टोळ्या भारतातील काही राज्यामध्ये सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती सैफ अली प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी तरुण शरीफुल याच्या चौकशीत समोर आली आहे. शरीफुल याला भारतीय नागरिकाच्या पासपोर्टवर परदेशात नोकरीसाठी जाण्यासाठी ३० हजार रुपयांची गरज होती. ३० हजार रुपये मिळविण्यासाठी त्याने अभिनेता सैफ अली खान याच्या घरी चोरी करण्यासाठी गेला होता अशी कबुली दिली आहे.

(हेही वाचा – Shivsena UBT ला धक्का; माजी आमदार संजय घाटगे, पांडुरंग बरोरा यांचा BJP मध्ये प्रवेश)

बांगलादेशात असलेल्या गरिबीला कंटाळून बांगलादेशी नागरिक भारतात घुसखोरी करीत होते. भारतातील मोठ्या शहरांमध्ये हे बांगलादेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव्य करून मोलमजुरी करीत होती. परंतु मागील काही वर्षांपासून बांगलादेशी तरुणांना (Bangladesh Youngster) सौदी, कॅनडा या देशांचे वेध लागले आहे. या देशात भारतीय नागरिकांना सर्वात अधिक प्राधान्य असल्यामुळे बांगलादेशी तरुणांची भारतीय पासपोर्ट मिळविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. पश्चिम बंगाल या राज्यात बांगलादेशी तरुणाचे (Bangladesh Youngster) बोगस कागदपत्रे आणि पासपोर्ट तयार करणारे एजंटच्या टोळ्या मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या आहेत.

(हेही वाचा – Cabinet Decision : नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या मालमत्ता भाडेपट्टा नियमांत सुधारणा; नवीन दरांना मंत्रिमंडळाची मंजुरी)

अभिनेता सैफअली प्रकरणातील आरोपी शरीफुल याला देखील परदेशात नोकरीसाठी जायचे होते. त्याच्यासोबत त्याचे अनेक सहकारी देखील होते. हल्ल्याच्या काही महिने अगोदर शरीफुल भारतात घुसखोरी करून आला होता. प्रथम तो पश्चिम बंगाल येथे आला आणि त्याने एजंटची भेट घेतली. एजंटने त्याला भारतीय पासपोर्ट बनवून देण्यासाठी ३० हजार रुपये खर्च सांगितला होता. हे तीस हजार कमविण्यासाठी शरीफुल मुंबईत आला होता अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल सह काही राज्यामध्ये एजंटच्या टोळ्या मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. या एजंट टोळ्यांनी हजारो बांगलादेशी तरुणांना (Bangladesh Youngster) भारतीय पासपोर्ट बनवून सौदी, कॅनडा या देशात नोकरीसाठी पाठवले आहेत. या देशांमध्ये हजारो बांगलादेशी भारतीय नागरिक बनून नोकरी करीत असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.