नवी मुंबईतील बेलापूर परिसरातील शाहबाज गावातील एका फ्लॅटवर छापा टाकून पोलिसांनी ८ बांगलादेशी (Bangladeshi Arrested) नागरिकांना अटक केली आहे. ते सर्व वैध कागदपत्रांशिवाय गेल्या चार वर्षांपासून येथे राहत होते. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे.
(हेही वाचा – CAA Act : सीएएची अंमलबजावणी ही मोदींची आणखी एक हमी – विष्णुदत्त शर्मा)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
बेलापूर मधील शहबाज गावात काही बांगलादेशी नागरिक (Bangladeshi Arrested) बेकायदेशीरपणे राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या आधारावर पोलिसांनी सोमवारी (११ मार्च) शाहबाज येथील निवासी संकुलावर छापा टाकला आणि आठ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. यामध्ये २० ते ४० वयोगटातील पाच महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध परदेशी नागरिक कायदा आणि पासपोर्ट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची पुढील चौकशी केली जात आहे.
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीमध्ये वंचित ची जाहीर नाराजी …)
केंद्र सरकारने सोमवारी (११ मार्च) देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू केला यानंतर पोलिसांनी नवी मुंबईतून ८ बांगलादेशी नागरिकांना (Bangladeshi Arrested) अटक केली.
मानव तस्करीविरोधी पथकाची कारवाई :
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ८ बांगलादेशी नागरिकांना (Bangladeshi Arrested) अटक करण्यात आली असून गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या मानव तस्करीविरोधी पथकाने सोमवारी सकाळी बेलापूर परिसरातील शाहबाज गावातील निवासी संकुलातील फ्लॅटवर छापा टाकला आणि आठ बांगलादेशी नागरिकांना अटक केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community