Bangladeshi Infiltrators: अवघ्या ४५ दिवसांत २९९ बेकायदेशीर बांग्लादेशींना मुंबईतून अटक

34

घुसखोर बांगलादेशी विरोधात राबविण्यात येणारी  मोहीम अतितीव्र करण्यात आली आहे. यामध्ये मागील २४ तासांत मुंबईतुन २७ घुसखोर नागरिकांना अटक करण्यात आली आहे. घसुखोर बांगलादेशी विरुद्ध राबविण्यात येणाऱ्या मोहीमे दरम्यान मागील ४५ दिवसांत २९९ बांगलादेशी घुसखोराविरुद्ध कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षातील बांगलादेशी घुसखोराविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाई आलेल्या कारवाई पैकी ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Bangladeshi Infiltrators)

राज्यात बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न गंभीर होत आहे, मुंबईसह (Mumbai) राज्यभरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिकांनी बेकायदेशीरपणे घसुखोरी केली आहे. महत्त्वाच्या शहरामध्ये घुसखोर नागरिकांची संख्या वाढत आहे. राज्य शासनाने या घुसखोराविरोधी विशेष मोहीम (Special campaign against infiltration, Mumbai) राबवली आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police)  दलाचे  सहपोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी म्हणाले , “गेल्या ४५ दिवसांत आम्ही २९९ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. मागील वर्षांत, आम्ही भारतात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या सुमारे १५०-१६० बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. यातील बहुतेक आरोपींनी विविध सीमा मार्गांनी देशात प्रवेश केला. आम्ही मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना वैध पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय राहणाऱ्या बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

(हेही वाचा – Malvan मध्ये राष्ट्राविरोधी घोषणा देणाऱ्या धर्मांध मुसलमानांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई)

चौधरी पुढे म्हणाले, “आमच्याकडे विशेष शाखा-१ ची एक विशेष आय-शाखा आहे जी बेकायदेशीर स्थलांतरितांना त्यांच्या संबंधित देशांमध्ये सक्रियपणे पाठवत आहे. ज्यात पाकिस्तान आणि बांगलादेशचा (Bangladesh) समावेश आहे. अनेक बांगलादेशी नागरिक भारतीय नागरिकत्वाचा दावा करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करतात, त्यामुळे आम्ही कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी आधार आणि पॅन कार्ड केंद्रांसोबत देखील काम करत आहोत.”

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.