मेघालय पोलिसांनी (Meghalaya Police) गारो हिल्स जिल्ह्यातील (Garo Hills District) जेंगजल येथे आसाममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना 6 बेकायदेशीर बांगलादेशी आणि त्यांना मदत करणाऱ्या 2 भारतीय नागरिकांना अटक केली आहे. (Bangladeshi infiltrators)
गुप्तचर माहितीनंतर (intelligence information) गुरुवारी रात्री एक विशेष मोहीम सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. गारो हिल्स जिल्ह्यातील जेंगजल येथून आसाममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी एका महिलेसह सहा बेकायदेशीर बांगलादेशींना अटक केली आहे.
(हेही वाचा – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करावीत; Shivendrasinhraje Bhosale यांनी दिल्या सूचना)
मिळलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या बांगलादेशींची (Bangladeshi) ओळख पटली असून यामध्ये रुहुल अमीन (33), दादान उर्फ दिन इस्लाम (38), दिलवार हुसेन (27), सरमन बेगम (35), सुलतान महमूद (37) आणि राबेल कोबिरास (33) अशी त्यांची नावे आहेत. याशिवाय, पोलिसांनी मेघालयातील गारो हिल्स जिल्ह्यातील काही लोकांना आसाममध्ये या बेकायदेशीर बांगलादेशींना प्रवेश देण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. गोलपारा जिल्ह्यातील (Goalpara District) रहिवासी असलेले रकीबुल इस्लाम (20) आणि जिलहक अली (28) अशी अशी या दोघांची नावे असून याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community