महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) 6 महिलांसह 16 बांगलादेशी नागरिकांना अवैधरित्या भारतात (illegal citizen) प्रवेश केल्याबद्दल आणि वैध कागदपत्रांशिवाय राहिल्याबद्दल अटक केली. एटीएसने सुरू केलेल्या विशेष मोहिमेदरम्यान (ats special campaign) ही अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. महाराष्ट्र पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘गेल्या २४ तासांत नवी मुंबई, ठाणे आणि सोलापूरमध्ये पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. बांगलादेशातून भारतात बेकायदेशीरपणे (Illegal Bangladeshis) घुसलेल्या ७ पुरुष आणि ६ महिलांना आम्ही अटक केली आहे. त्याच्यावर फॉरेनर्स ॲक्ट आणि इतर संबंधित कायद्यांतर्गत तीन गुन्हे दाखल आहेत. (Bangladeshi infiltrators)
या बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून आधार कार्डसारखी भारतीय कागदपत्रे मिळवली होती. असे अधिकाऱ्याने सांगितले. एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की, एटीएस आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी रात्री जालना जिल्ह्यातून तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केली. आरोपी भोकरदन तालुक्यात क्रशर मशीनवर काम करत होते. एटीएस आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत त्यांना अन्वा आणि कुंभारी गावातून अटक करण्यात आली.
(हेही वाचा – Hawkers : फेरीवाल्यांवर कारवाई नको, पण किमान पदपथावर बांधून ठेवलेले सामान तरी हटवा!)
भारतात बेकायदेशीरपणे काम करण्यासाठी तिघांनी आपली खोटी ओळखपत्रे बनविल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ते गेल्या दोन वर्षांपासून बेकायदेशीरपणे राहत होते. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि परदेशी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली होती.
(हेही वाचा – रुपाली ठोंबरेंकडून Jitendra Awhad यांचे व्हॉट्सअप चॅट व्हायरल; बीडमध्ये मोर्चाच्या आडून काय होता प्लॅन?)
महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांवर पोलीस कारवाई सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, ‘सरकारची भूमिका पूर्णपणे स्पष्ट आहे. असे सर्व बांगलादेशी नागरिक जे बेकायदेशीरपणे भारतात राहत आहेत. त्यांना शोधून हद्दपार करण्याची सरकारची भूमिका असून आम्ही हे काम सुरूही केले आहे. त्याच धर्तीवर मुंबई, नवी मुंबई, धुळे, भिवंडी आणि राज्यातील इतर भागात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची ओळख पटवण्यासाठी राज्य पोलिस विशेष मोहीम राबवत आहेत.
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community