
-
प्रतिनिधी
अंधेरी वर्सोवा येथे २५ वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या एका घुसखोर बांगलादेशी दाम्पत्याला वर्सोवा पोलिसांनी अटक केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या दाम्पत्याना २३ वर्षांचा मुलगा असून या मुलाचा जन्म मुंबईत झाला आहे. त्यालादेखील अटक करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Bangladeshi Infiltrators)
इक्बाल हनीफ शेख (४३) आणि अदोरी इक्बाल शेख (३७) असे अटक करण्यात आलेल्या घुसखोर बांगलादेशी दाम्पत्याचे नाव आहे. इक्बाल हा बांगलादेशी नागरिक त्याची पत्नी अदोरीसह सुमारे २५ वर्षांपूर्वी कामाच्या शोधात त्याने बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला आणि मुंबईत एका बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. दोन वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला. पोलिसांनी सांगितले की, त्यांना एका गुप्त माहितीवरून त्यांच्या बेकायदेशीर वास्तव्याबद्दल माहिती मिळाली होती, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना पकडण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले. त्यांना १५ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. “या जोडप्याने ते बांगलादेशी नागरिक असल्याचे कबूल केले आणि आम्ही त्यांना वैध पासपोर्ट आणि व्हिसाविना भारतात राहिल्याबद्दल अटक केली आहे. आम्ही त्यांच्या मुलालाही अटक करू कारण तो देखील वैध कागदपत्रांशिवाय राहत आहे,” असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. (Bangladeshi Infiltrators)
(हेही वाचा – महापालिका आयुक्त गगराणी पोहोचले Dadar Cemetery मध्ये; सुविधा पाहून अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ निर्देश)
नाव न सांगण्याच्या अटीवर एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “बांगलादेशी लोक भारतात त्यांची ओळख लपवत आहेत आणि त्यांची नावे बदलत आहेत. ते भारतीय नागरिक असल्याचा दावा करून बनावट बओळखपत्रे देखील बनवत आहेत.” “बऱ्याच प्रकरणांमध्ये त्यांना जामीन मिळतो तर बऱ्याचदा ते बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध करतात. अनेक आव्हाने आणि लांबलचक प्रक्रियांमुळे आम्हाला तपासात अडचणी येत आहेत,” असे अधिकाऱ्याने सांगितले. (Bangladeshi Infiltrators)
या प्रकरणावर बोलताना एका वकीलाने म्हटले आहे की, सुनील नागरिकत्व कायदा, १९५५ नुसार, या दाम्पत्याच्या मुलांना भारतीय नागरिक होण्यासाठी किमान एक पालक भारताचा नागरिक असावा. शिवाय, दुसरा पालक बेकायदेशीर स्थलांतरित नसावा. नागरिकत्व सुधारणा कायदा २०२० अंतर्गत निर्दिष्ट केलेल्या नियमांमध्ये असे म्हटले आहे की अर्जदारांना सहा प्रकारची कागदपत्रे द्यावी लागतील आणि भारतात त्यांची ‘प्रवेश तारीख’ निर्दिष्ट करावी लागेल. या नियमांमुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये धार्मिक कारणास्तव छळ झालेल्या अल्पसंख्याकांना भारतात नागरिकत्व मिळू शकेल, असे वकील म्हणाले. (Bangladeshi Infiltrators)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community