Bangladeshi Infiltrators : मुंबई पोलिसांच्या रडारवर हॉटेल व्यावसायिक, लेबर कंत्राटदार आणि विकासक

109
Bangladeshi Infiltrators : मुंबई पोलिसांच्या रडारवर हॉटेल व्यावसायिक, लेबर कंत्राटदार आणि विकासक
  • प्रतिनिधी 

घुसखोर बांगलादेशींचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. बांगलादेशी घुसखोरांना (Bangladeshi Infiltrators) अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली असून या बांगलादेशी घुसखोरांना आश्रय तसेच काम देणारे देखील मुंबई पोलिसांच्या रडारवर आले आहे. मुंबई शहरासह उपनगरातील हॉटेल, बांधकामाची ठिकाणे, लॉजिंग बोर्डिंग तसेच संशयित फेरीवाले तपासण्याचे आदेश मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहे. ज्या ठिकाणी घुसखोर बांगलादेशी आढळून आला त्या आस्थापना तसेच कंत्राटदार यांच्यावर देखील कारवाई करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहे.

(हेही वाचा – Tata Steel Chess 2025 : गुकेशचा टायब्रेकरवर पराभव करत प्रग्यानंद विजेता)

मुंबईसह राज्यभरात बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचे प्रमाण खूप वाढले आहे. कित्येक घुसखोर बांगलादेशी नागरिक (Bangladeshi Infiltrators) बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय असल्याचे पुरावे तयार करून वर्षानुवर्षे मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई इत्यादी शहरात वास्तव्यास आहे. तसेच या घुसखोरांकडून सरकारी योजनांना लाभ घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघड देखील झाले आहे. मुंबई पोलिसांसह राज्यातील इतर पोलिसांकडून मागील काही महिन्यांपासून बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर (Bangladeshi Infiltrators) मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांच्या या कारवाईत अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांकडून अनेक धक्कादायक माहिती समोर आली. तसेच त्याच्यांकडून जप्त करण्यात आलेल्या बोगस पत्रावरून या बांगलादेशी नागरिकांनी भारतातील निवडणुकांमध्ये मतदान केल्याचे देखील समोर आले आहे.

(हेही वाचा – CSMT स्थानकावर लवकरच १५० हायटेक बॅगेज, बॉडी स्कॅनर मशीन बसवणार)

घुसखोर बांगलादेशी नागरिकांचे (Bangladeshi Infiltrators) आश्रयस्थान हे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बांधकामाची ठिकाणे, वेगवेगळे सरकारी प्रकल्प, शहरातील हॉटेल, डान्स बार, लॉज, कुटंणखाने, फेरीचा व्यवसाय इत्यादी असल्याचे पोलिसांनी केलेल्या आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. बांधकाम व्यावसायिकाकडे मोठ्या प्रमाणात बांगलादेशी मजूर काम करतात, आणि तिथेच राहतात. तसेच शहरातील डान्सबार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांगलादेशी तरुणी वेटर आणि नर्तकी म्हणून कामे करीत आहे. कुटंणखाण्यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी महिलांचा समावेश असल्याचे समोर आलेले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या रडारवर हॉटेल व्यावसायिक, बांधकाम मजूर कंत्राटदार, आणि बेकायदेशीर फेरीवाले आले आहेत. मुंबई शहरासह उपनगरातील हॉटेल, बांधकामाची ठिकाणे, लॉजिंग बोर्डिंग तसेच संशयित फेरीवाले तपासण्याचे आदेश मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहे. ज्या ठिकाणी घुसखोर बांगलादेशी (Bangladeshi Infiltrators) आढळून आला त्या आस्थापना तसेच कंत्राटदार यांच्यावर देखील कारवाई करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.