मुंबईसह परिसरातील जिल्ह्यामध्ये बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकांची घुसखोरी झाली आहे. भारतीय असल्याचे बोगस कागदपत्रे तयार करून हे बांगलादेशी घुसखोर शहरातील झोपडपट्या, बांधकाम ठिकाणावर आपली वस्ती करून राहत आहे. या बांगलादेशीयांना बोगस कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळ्या शहरात वावरत आहे.
मुंबईसह नवी मुंबई पोलिसांनी मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणात घुसखोर बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकांना अटक करून त्यांची रवानगी बांगलादेशात केली आहे. परंतु बांगलादेशी घुसखोर दलालाच्या मदतीने पुन्हा भारतात घुसखोरी करून शहरे बदलून राहत असल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आलेले आहे. चारकोप पोलिस आणि एटीएसच्या पथकाने कांदिवली पश्चिम भूमीपार्क, एकता नगर येथील बांधकाम ठिकाणी ३ बांगलादेशी तरुणांना अटक केली आहे, हे तिघे बांगलादेशी तरुण बांधकामाच्या ठिकाणी काम करण्यासाठी भारताची सीमेत बेकायदेशीरपणे घुसखोरी करून आल्याचे तिघांनी मान्य केले.
(हेही वाचा Election Commission : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह गोठवू नका; शरद पवार गटाची मागणी)
शुमोन शाहेब सबदर (१९), अब्दुल रहीम मुल्ला (१९), मोहम्मद उज्जल नरुल शेख असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांना बांधकामाच्या ठिकाणी मजुरी करण्यासाठी आणण्यात आले होते. मुंबईत मोठ्या प्रमाणात इमारतीचे बांधकाम सुरू असून या बांधकामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकांना मजुरीच्या कामावर ठेवण्यात येत आहे. तसेच हे बांगलादेशी नागरिक मुंबई तसेच नवी मुंबई ठाण्यातील झोपडपट्टयामध्ये बेकायदेशीररित्या वास्तव्य करून राहत आहे. चारकोप पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या तिघांच्या माहितीवरून पोलिसांनी शहरातील बांधकाम ठिकानाची तपासणी सुरू केली असून त्या ठिकाणी काम करणाऱ्या संशयित मजुरांकडे चौकशी सुरू आहे.
Join Our WhatsApp Community