भोसरीत वास्तव्य करणाऱ्या Bangladeshi infiltrators अटकेत; बनावट कागदपत्रे जप्त

211
पिंपरी – चिंचवड दहशतवाद विरोधी पथकाने बनावट कागदपत्रांसह पाच बांगलादेशी नागरिकांना (Bangladeshi infiltrators) अटक केली. बनावट कागदपत्रांसह भारतात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या ५ जणांना दहशतवाद विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आहे. पिंपरी – चिंचवड शहरातील भोसरी भागात ही कारवाई करण्यात आली.
यात पोलिसांनी शमीम नुरोल राणा, राज उर्फ सम्राट सदन अधिकारी, जलील नरू शेख उर्फ जलील नूर मोहम्मद गोलदार, वसीम अजीज उलहक मंडल उर्फ वसीम अजीऊल हक हिरा, आझाद शमशुल शेख उर्फ अबुल कलाम शमशुद्दिन फकीर या पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. तसेच पोलिसांकडून त्यांना बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या दोघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या पाच बांगलादेशी नागरिकांकडून (Bangladeshi infiltrators) अकरा हजार रुपये किमतीचा मोबाईल, एअरटेल कंपनीचे सीम आदी साहित्य जप्त केले आहे. त्यांच्यावर परकीय नागरिक कायदा पारपत्र अधिनियम आणि भारतात प्रवेश करण्याचा नियम यानुसार गुन्हे दाखल केले आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.