मुंबई पोलीसांकडून घुसखोर बांगलादेशी नागरिकांविरुद्ध मोहीम तीव्र करण्यात आली आहे, मागील काही दिवसात मुंबईतील विविध भागातून बेकायदेशीर राहणाऱ्या ६ घुसखोर बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस ठाण्यातील ‘दहशतवाद विरोधी सेल’च्या पथकाकडून करण्यात आली असून अटक करण्यात आलेल्या घुसखोर बांगलादेशी नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात भारतीय असल्याचे बोगस कागदपत्रे आढळून आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Bangladeshi infiltrators)
(हेही वाचा- वायनाडमध्ये Rahul Gandhi आणि Priyanka Vadra यांच्या विजयामागे मुसलमानांचा पाठिंबा; माकपने केली पोलखोल)
रुबीना अबूहसन शेख, मोहम्मद बिलप मोहम्मद सहाबुद्दीन शेख, मोहम्मद मसुद मतीन रेहमान राणा, मोहीन हयात बादशाह शेख, युनूस आक्काश शेख आणि ताहीर गफुर शेख अशी अटक करण्यात आलेल्या घुसखोर बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत. त्याच्याविरुद्ध भारतात घुसखोरी करून बोगस कागदपत्रे बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले बांगलादेशी नागरिक मागील २० ते २२ वर्षांपासून मुंबईत वास्तव्य करीत असल्याचे धक्कादायक माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आली आहे. (Bangladeshi infiltrators)
पूर्व उपनगरातील मानखुर्द, ट्रॉम्बे महाराष्ट्र नगर, दक्षिण मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्याच्या समोर असणाऱ्या आंबेडकर नगर झोपडपट्टी, पश्चिम उपनगरातील अंधेरी जुहू गल्ली, गोरेगाव फिल्म सिटी संतोष नगर, जोगेश्वरी लोटस पेट्रोलपंप इत्यादी ठिकाणी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यानी कारवाई करून घुसखोर बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत अटक करण्यात आलेले बांगलादेशी नागरिक मागील २० ते २२ वर्षांपासून मुंबई तसेच जवळपासच्या शहरात राहत होती, या घुसखोर बांगलादेशी नागरिकानी भारतीय असल्याचे खोटे पुरावे तयार करून नावे बदलून शहरातमध्ये राहत होते अशी माहिती समोर आली आहे. (Bangladeshi infiltrators)
अटक करण्यात आलेल्या घुसखोर नागरिकांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते, न्यायालयाने या घुसखोर बांगलादेशीना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती एका पोलीस अधिकारी यांनी दिली. (Bangladeshi infiltrators)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community