Bangladeshi Infiltrators : आता ग्रामीण भागातही बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी; सहा बांगलादेशी महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

76
Bangladeshi Infiltrators : आता ग्रामीण भागातही बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी; सहा बांगलादेशी महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Bangladeshi Infiltrators : आता ग्रामीण भागातही बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी; सहा बांगलादेशी महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबई किंवा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातच बांगलादेशी घुसखोरांची (Bangladeshi Infiltrators) वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत बांगलादेशी नागरिकांवरील कारवाई वाढत आहे. त्यातच आता ग्रामीण भागात घुसखोरी या सर्व प्रकारांमुळे खळबळ उडाली असून बांगलादेशीय लोकांचे थेट बार्शी सारख्या ग्रामीण भागात देखील घुसखोरी करून वास्तव्य केले जात असल्याचे उघड झाले आहे. (Bangladeshi Infiltrators)

हेही वाचा-राज्यभरात सार्वजनिक बसचा तुटवडा: 1 लाख प्रवाशांमागे फक्त 60 बसेस; ITDP Report मधून ही माहिती आली समोर 

बार्शीतील (Barshi) पंकजनगर भागात बेकायदेशीररित्या बनावट आधार कार्ड तयार करून राहणार्‍या सहा बांगलादेशी नागरिकांवर (Bangladeshi women) गुन्हा दाखल केला आहे. सोलापूर (Solapur) येथील दहशतवाद विरोधी पथक (Anti-Terrorism Squad) , एटीबीचे पथक व बार्शी पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. (Bangladeshi Infiltrators)

हेही वाचा-BMC : महापालिकेचे सात पैकी दोन सहायक आयुक्त २६ जानेवारीनंतर होणार सेवेत रुजू

त्यांच्याकडून १ लाख 41 हजार 600 रुपये व 46 हजारांचे मोबाईल जप्त केले आहेत. याबाबत महिला पोलीस निरीक्षक सोनम जगताप यांनी घुसखोरी व बनावट दस्तऐवज याच्या वापरासंदर्भात शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. (Bangladeshi Infiltrators)

हेही वाचा-दरवर्षी ५ हजार लालपरी बसेस खरेदी करण्याचा ST Corporation चा निर्णय

चौकशीत त्यांच्याकडे कोणताही वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नसल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी नजमा यासिन शेख (३३), रेहना बेगम समद शिकदर (३३), आरजिना खातून अनवर शेख (१६), शिखा शकीब बुहिया २३, शकीब बादशाह बुहिया (२३), शोएब सलाम शेख (२४) बांगलादेशीय सहा महिलांना ताब्यात घेतले आहे. (Bangladeshi Infiltrators)

हेही वाचा-Tata Mumbai Marathon 2025 निमित्त धावणार विशेष लोकल रेल्वे; जाणून घ्या वेळापत्रक

तर यांच्या चौकशीत येथील पंकजनगर येथे वास्तव्य करण्यास मदत करणारे बार्शी येथील विशाल मांगडे, राणी (पूर्ण नाव माहीत नाही) व किरण परांजपे या सर्वांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bangladeshi Infiltrators)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.