Bangladeshi Infiltrators : बांगलादेशी घुसखोरांपासून मुंबईला धोका; पैशांसाठी जाऊ शकतात कोणत्याही थराला

56
Bangladeshi Infiltrators : बांगलादेशी घुसखोरांपासून मुंबईला धोका; पैशांसाठी जाऊ शकतात कोणत्याही थराला
  • प्रतिनिधी 

मुंबईसह राज्यातील इतर महानगरांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचे (Bangladeshi Infiltrators) प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. भारतातील प्रमुख शहरांमध्ये घुसखोरी करून राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांमुळे देशाला धोका निर्माण होत आहे. या बांगलादेशी घुसखोरांना बांधकाम क्षेत्र, हॉटेल, खाजगी सुरक्षा एजन्सी येथे मोठ्या प्रमाणात आश्रय दिला जात असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेकवेळा समोर आले आहे. महानगरांमध्ये बांगलादेशी नागरिकांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे शहरांना बांगलादेशी नागरिकांकडून धोक्याची शक्यता वर्तवली जात आहे. सैफ अली खान वर हल्ला करणारा हल्लेखोर हा बांगलादेशी घुसखोर (Bangladeshi Infiltrators) असून शहजाद याला पैशाची नितांत गरज होती, त्यासाठी तो कुठलाही धोका पत्करण्यास तयार झाला होता. म्हणून त्याने धोका पत्कारून चोरीसाठी त्याने बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचे निवासस्थान निवडले होते अशी माहिती चौकशीत समोर आली आहे.

(हेही वाचा – हिंदू धर्मावर होणारे मुस्लिम व ख्रिश्चनीकरणाचे आक्रमण थांबवा; Mahant Ramgiri Maharaj यांचे विधान)

१६ जानेवारी रोजी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून हल्ला करणारा हल्लेखोर मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर उर्फ बिजय दास (३१) हा बांगलादेशी असल्याचे समोर आले आहे. एजंट मार्फत भारतात आलेला शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर हा काही महिने मुंबईतील वरळी ह्या जनता कॉलनी येथे भाड्याने राहत होता. तेथेच एका पबमध्ये हाऊसकिपींगचे काम करणारा आरोपी मोहम्मद शहजादला चोरी केल्याप्रकरणी कामावरून काढण्यात आले होते. बेरोजगार असल्याने आणि बांगलादेशला परतण्यासाठी शहजादला ५० हजार रुपयांची नितांत गरज असल्याने त्याने चोरी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पश्चिम उपनगरातील वांद्रे परिसरात त्याने अनेक हायप्रोफाईल सोसायटीची रेकी केली होती. शाहरुख खान यांच्या मन्नत बंगल्यात देखील त्याने घुसण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तेथील सुरक्षा व्यवस्था पहाता त्याला शक्य झाले नाही. अखेर सैफ अली खान राहत असलेल्या सदगुरु शरण या इमारतीत प्रवेश करणे सोपे वाटल्याने त्याने सदगुरु शरण ही इमारत लक्ष्य केली होती. या घटनेनंतर हल्लेखोर शहजाद हा गीतांजली एक्स्प्रेसने कोलकाता येथे पळून जाण्याचा आणि नंतर बांगलादेशात पळून जाण्याचा तयारीत होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (Bangladeshi Infiltrators)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.