हिंदू धर्मात दूर्गादेवीच्या पुजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दरवर्षी जगभरात नवरात्रोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजारा केला जातो. दि. ८ ऑक्टोबर रोजी रात्री बांगलादेशी (Bangladeshi) सैन्य, जमात-ए-इस्लामी आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि मदरशातील विद्यार्थी यांनी ढाक्यातील एका दुर्गादेवीच्या मंडपात देवीच्या मूर्तींची (Durga Devi Idol) विटंबना केली आहे. ‘राजबारी बस ओनर्स असोसिएशन’ या संघटनेने नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी दुर्गादेवीच्या मूर्तींची (Durga Devi Idol) स्थापना केली होती.
(हेही वाचा : Jammu Kashmir Assembly Election : जम्मूमध्ये काँग्रेसचा सफाया; BJPने जिंकल्या ११ पैकी १० जागा)
मात्र येथील कट्टरपंथींनी दुर्गादेवीच्या मूर्तीची (Durga Devi Idol) विटंबना केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना स्थानिकांना कळू नये यासाठी तिथल्या प्रशासनाने संपूर्ण मंडप पडद्यांनी झाकले होते, अशी माहिती एका स्थानिक हिंदुत्वनिष्ठाने (Hindu) वृत्तसंस्थांना दिली आहे. दरम्यान दुर्गादेवीच्या छायाचित्रात स्पष्ट दिसत आहे की, कट्टरपंथींनी कशाप्रकारे हिंदू (Hindu) दैवतांची विटंबना केलेली आहे. यामध्ये दुर्गादेवीच्या मूर्तीच्या (Durga Devi Idol) चेहऱ्याची तोडफोड केल्याचे निदर्शनास आले. यामुळे जगभरातील हिंदूंनी (Hindu) बांगलादेशातील या कट्टरपंथींच्या कृत्याचा जाहिर निषेध केला आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community