Bangladeshi Infiltrators : जुन्नरमधून बांगलादेशी माय-लेक ताब्यात; पतीचा शोध सुरू

52

नारायणगावात बांगलादेशी नागरिकांच्या वास्तव्याच्या घटना ताज्या असतानाच आता छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीच्या (Shivneri) पायथ्याशी असलेल्या जुन्नर (Junnar) शहरात देखील बांगलादेशी नागरिकांच्या वास्तव्याची घटना उघडकीस आली आहे. (Bangladeshi Infiltrators)

(हेही वाचा – Saudi Arabia ची भारत, पाकिस्तानसह १४ देशांवर व्हिसा बंदी; Muslim नागरिकांची इस्लामी राष्ट्राकडूनच गोची )

शहरातील मध्यवर्ती भागात एका इमारतीमध्ये अवैधरीत्या वास्तव्य करणार्‍या बांगलादेशी महिलेस जुन्नर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जुन्नर पोलिसांनी दिली.

दहशतवाद विरोधी शाखा (Anti Terrorism Branch) पुणे व जुन्नर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये साथी ऊर्फ सनम मंडल हिस तिच्या लहान बालकासह ताब्यात घेण्यात आले असून, तिचा पती शाहआलम अब्दुल मंडल हा मात्र मिळून आला नाही. त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. (Bangladeshi Infiltrators)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.