Bangladeshi Infiltrators : वीस वर्षांपासून मुंबईत घुसखोरी करून राहणाऱ्या बांगलादेशींना अटक

48
Bangladeshi Infiltrators : बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करणाऱ्या बांगलादेशी घुसखोराला अटक
Bangladeshi Infiltrators : बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करणाऱ्या बांगलादेशी घुसखोराला अटक

बांगलादेशातून भारतात २० वर्षांपूर्वी घुसखोरी करून आलेल्या ७ बांगलादेशी (Bangladeshi Infiltrators) नागरिकांना गोवंडी,मानखुर्द आणि कांदिवली (Kandivali) येथून अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांकडे भारतीय निवडणूक ओळखपत्र, आधारकार्ड मिळून आले आहे. ही कारवाई मागील २४ तासात करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मोहम्मद ओसीम अब्बास शेख (Mohammad Oseem Abbas Shaikh) (३९), सध्या राहणार- हाजि बंदर रोड (Haji Bandar Road), सिमेंट धक्का शिवडी पूर्व) मूळगाव-शिकारीपारा, पोस्ट- गुनी बाजार, ठाणा- कोलाली, जिल्हा- जेशोर बांगलादेश, अलमीन दाऊद शेख (५२) आणि अंजुरा आलमीन शेख (४५)( सध्या राहणार- हाजी बंदर रोड, सिमेंट धक्का, शिवडी) मूळगाव -गटखळी, पो -जिकर गच्चा, जिल्हा – जेषोर,देश- बांगलादेश या तिघांना शिवाजी नगर पोलिसांनी गोवंडीतील लोटस जंक्शन येथून संशया वरून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी प्रथम पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली, दरम्यान पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता ते मूळचे बांगलादेशाचे नागरिक असून नोकरीच्या शोधात २० वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी करून आले, त्यानंतर मुंबईत येऊन शिवडी येथे राहू लागले, मजुरी करीत असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

दरम्यान मानखुर्द पोलिसांनी मोहम्मद शोवाक हकीम मंडल (Mohammad Showak Hakim Mandal) (३३) या भंगार विक्रेत्याला मानखुर्द -घाटकोपर लिंक रोड येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता तो पालघर जिल्ह्यातील वसई, गिरीश डोंगरी येथे सद्या राहणार असून त्याचे मुळगाव- माठीकुमरा, ठाणा-जिगरकच्छा, जिल्हा जैसार, गाव बेनपोल, विभाग खुलना देश- बांगलादेश असे असल्याचे सांगितले.मानखुर्द पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल फोन, आधारकार्ड,भारतीय निवडणूक ओळखपत्र जप्त केले आहे. मोहम्मद मंडल हा मागील काही वर्षांपासून भारतात घुसखोरी करून राहत असल्याची माहिती त्याने दिली.

कांदिवली पूर्व समता नगर पोलिसांनी खादीजा फुलतन मरोल (३८) या बांग्लादेशी महिलेला समता नगर बस आगार, ठाकूर व्हिलेज कांदिवली पूर्व येथून संशयावरून ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता ती सध्या – शिवाजी नगर, अंजुर फाटा, भिवंडी येथे राहणारी असून मूळची बांग्लादेशातील गाव- गडखली ठाणा-चालना, डाकू पठाणा, पोस्ट-बडबुनीया, जिल्हा खुलना असे असल्याची माहिती तीने पोलिसांना दिली. मागील अनेक वर्षांपूर्वी ती भारतात घुसखोरी करून आली होती, त्यानंतर ती भिवंडी येथे राहू लागली, घरकाम करून स्वतःचा आणि कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होती समता नगर पोलिसांनी तिला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.