Beed Accident: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ३ तरूणांना भरधाव ST बसने चिरडले

66
Beed Accident: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ३ तरूणांना भरधाव ST बसने चिरडले
Beed Accident: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ३ तरूणांना भरधाव ST बसने चिरडले

बीड (Beed Accident) परळी महामार्गावर (Parli Highway) रविवारी (१९ जाने.) सकाळच्या सुमारास एसटी बसने तीन तरुणांना उडवले. पोलीस भरतीसाठी (Police Bharti) तयारी करणाऱ्या 3 तरुणांचा यात जागीच मृत्यू झाला आहे. हे तरुण नेहमीप्रमाणे पहाटे व्यायाम करण्यासाठी जात होते. यावेळी मागून भरधाव वेगात येणाऱ्या एसटी बसने तरुणांना धडक दिली. बालाजी मोरे, ओम घोडके, आणि विराज घोडके अशी मृत तरुणांची नावे आहेत. (Beed Accident)

हेही वाचा-Saif ali khan वर हल्ला करणारा हल्लेखोर निघाला बांगलादेशी घुसखोर; पोलिसांकडून खुलासा

घोडका राजुरी जवळ झालेल्याया या अपघातात 3 तरुणांचा चिरडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तरुणांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. या तरुणांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती कळताच या तरुणांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरु आहे. (Beed Accident)

हेही वाचा-SSC & HSC Board Exam 2025 : परीक्षा मंडळाचा ‘जात प्रवर्ग’चा निर्णय अखेर रद्द; नवे हॉल तिकीट मिळणार!

परळी महामार्गावर झालेल्या अपघातात बस सिमेंटच्या रस्त्यावरून खाली घसरली असून बसचा मागच्या काचा फुटल्या आहेत. या बसमध्ये प्रवासी होते का याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नसून नेमका कशाने अपघात झाला? याचा तपास पोलीस करत आहेत. (Beed Accident)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.