अफू (Afu Farming) पिकवण्यावर शासनाने निर्बंध घातलेले असतानाही बीडच्या (Beed Crime) धारूर तालुक्यात पिंपळवाड्यात शेतकऱ्याने चक्क 3 गुंठ्यावर अफूची शेती (opium seized ) पिकवली असल्याचे समोर आले आहे. रामहरी कारभारी तिडके या शेतकऱ्याने बालाघाट पर्वतरांगेतील 3 गुंठे क्षेत्रावरअफूचे पीक घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धारूर पोलीस याबाबतचा पुढील तपास करत आहेत. (Beed Crime)
हेही वाचा-Mangrove forest : राज्यात 1 हजार 239 हेक्टरने कांदळवनांमध्ये वाढ
विशेष म्हणजे शेततळ्याच्या पाण्यावर या शेतकऱ्यांना अफू शेतीचा विस्तार करण्यात आला आहे. याबाबत माहिती मिळताच बीड एलसीबी आणि धारूर पोलिसांनी कारवाई करत शेतीतील अफू उपटत साधारण 50 गोण्या अफू जप्त केला आहे. नशेखोरांकडून नशा करण्यासाठी अफूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. (Beed Crime)
अफूच्या शेतीबाबत बीड एलसीबीला (LCB) माहिती मिळाल्यानंतर तीन अधिकारी आणि १२ पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी शोधमोहिम राबवली. दु. १२ वाजल्यापासून सुरू झालेली ही मोहिम सायं. ६ वाजेपर्यंत चालली. (Beed Crime)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community