हळद आणि लग्न हे दोन्ही एकाच दिवशी असल्याने सकाळपासून मंगल कार्यालयात गर्दी होती. लग्नाला काही अवधी शिल्लक असतानाच नवरीच्या दागिन्यावर अज्ञात चोरट्यानी डल्ला मारल्याची घटना सोमवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील (Beed-Nagar National Highway) एका मंगलकार्यालयात घडली. (Beed Crime News)
आष्टी तालुक्यातील (Aashti Taluka) आनंदवाडी येथील साईनाथ बोडखे याचे चिरंजीव प्रदिप यांचा खाकाळवाडी येथील दिपक नवले यांची मुलगी निकीता हिच्याशी सोमवारी बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील मंगलकार्यालयात विवाह होता. सकाळी हळद आणि लग्न हे दोन्हीही विधी एकाच दिवशी असल्याने नवरदेवाच्या वडिलांनी नवरीसाठी मंगळसुत्र, मिनी गंठण, नथनी, कानातले झुंबके असे सव्वाचार लाखांचे सोन्याचे दागिने आणले होते. (Beed Crime News)
(हेही वाचा – Dadar-Dharavi Nala : दादर-धारावी नाल्यातील पाण्याच्या प्रवाहाला ब्रेक; आठ दिवसांतच अनेकदा शिरले लोकांच्या घरांमध्ये पाणी)
हळदीचा कार्यक्रम चालू होता. त्यानंतर थोड्या वेळात लग्न लागणार असल्याने आवराआवर सुरू होती. नवरदेवाच्या नातेवाईक असलेल्या महिलेच्या पर्समध्ये हे दागिने होते. पण घाईगडबडीची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी (Gold theft) या दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना घडली.
(हेही वाचा – DCM Devendra Fadanvis: आषाढी एकादशीनिमित्त ‘बा पांडुरंग’ आणि वारकरी माऊलींना उपमुख्यमंत्र्यांकडून वंदन)
या प्रकरणी नवरदेवाचे वडिल साईनाथ बोडखे यांनी आष्टी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात सोने चोरीची तक्रार दाखल केली आहे. (Beed Crime News)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community