बंगळुरूतील (Bengaluru Consumer Court) एम. एस. नगरमधील रहिवासी विजय कुमार हे त्यांच्या मुलासाठी वधू शोधत होते. त्याचवेळी त्यांना दिलमिल मॅट्रिमोनियल पोर्टलची (Matrimony Portal) माहिती मिळाली. या कंपनीचं कार्यालय कल्याण नगरमध्ये आहे. विजय कुमार (Vijay Kumar) यांनी त्यांच्या मुलाची या पोर्टलवर नोंदणी केली. मात्र, अनेक प्रयत्न करुनही त्यांना या पोर्टलच्या मदतीने वधू शोधता आली नाही. परिणामी त्यांनी या पोर्टलविरोधात ग्राहक न्यायालयाचं (Bengaluru Consumer Court) दार ठोठावलं.
(हेही वाचा-Jammu and Kashmir : दहशतवाद्याला ठार मारण्यासाठी चक्क बिस्किटाचा वापर)
विजय कुमार हे १७ मार्च रोजी त्यांच्या मुलाचे दस्तावेज व फोटो घेऊन दिलमिल या मॅट्रिमोनियल पोर्टलच्या कार्यालयात गेले होते. पोर्टलच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विजय कुमार यांना ३० हजार रुपये शुल्क भरण्यास सांगितलं. त्यांनी ते शुल्क भरलं. त्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितलं की ४५ दिवसांमध्ये आम्ही तुमच्या मुलासाठी वधू शोधून देऊ. ४५ दिवसांनंतरही दिलमिल मॅट्रिमोनियल पोर्टल व तिथले कर्मचारी विजय कुमार यांचे पुत्र बालाजीसाठी वधू शोधू शकले नाहीत. या काळात व त्यानंतरही विजय कुमार यांना अनेकदा दिलमिलच्या कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागले. (Bengaluru Consumer Court)
(हेही वाचा-Canada: कॅनडातील हिंदू मंदिरावर खलिस्तानींचा हल्ला; VIDEO व्हायरल)
अनेकदा त्यांना कार्यालयात बसवून ठेवण्यात आलं, त्यांना वाट पाहायला लावली. ३० एप्रिल रोजी विजय कुमार दिलमिलच्या कार्यालयात गेले व त्यांनी त्यांचे पैसे मरत मागितले. मात्र, तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिला तसेच त्यांना शिवीगाळही केली. त्यांची टिंगल केली. त्यानंतर विजय कुमार यांनी न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला. ९ मे रोजी विजय कुमार यांनी दिलमिल पोर्टलला कायदेशीर नोटीस पाठवली. मात्र पोर्टलने त्यांच्या नोटिशीला कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही. (Bengaluru Consumer Court)
याप्रकरणी अनेक दिवस सुनावणी चालली. त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी ग्राहक न्यायालयाने याप्रकरणी निकाल दिला. न्यायालयाने (Bengaluru Consumer Court) त्यांच्या आदेशात म्हटलं आहे की, तक्रारदाराला त्याच्या मुलासाठी एकही वधू सुचवण्यास हे पोर्टल अपयशी ठरलं आहे. तसेच तक्रारदाराने दिलमिलच्या कार्यालयात जाऊन तक्रार केली तर त्याकडे पोर्टलने दुर्लक्ष केलं. त्यांनी तक्रारदाराचे पैसे त्याला परत दिले नाहीत. त्यामुळेच या मॅट्रिमोनियल पोर्टलला आम्ही दंड ठोठावत आहोत. याप्रकरणी न्यायालयाने ६० हजारांचा दंड ठोठावला आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community