Bengaluru Woman Murder: श्रद्धा वालकर हत्येची पुनरावृत्ती! शरीराचे ३० हून जास्त तुकडे करुन ठेवले फ्रिजमध्ये

197
Bengaluru Woman Murder: श्रद्धा वालकर हत्येची पुनरावृत्ती! बॉडीचे ३० हून जास्त तुकडे करुन ठेवले फ्रिजमध्ये
Bengaluru Woman Murder: श्रद्धा वालकर हत्येची पुनरावृत्ती! बॉडीचे ३० हून जास्त तुकडे करुन ठेवले फ्रिजमध्ये

सन २०२२ मधील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची आठवण करून देणारी खळबळजनक घटना बेंगळुरू (Bengaluru Woman Murder) शहरात उघडकीस आली आहे. एका २९ वर्षीय महिलेची राहत्या घरात हत्या करून, तिच्या मृतदेहाचे ३०हून अधिक तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बेंगळुरूत मल्लेश्वरम भागात उघडकीस आला आहे. महालक्ष्मी असे या महिलेचे नाव असून ती एकटी राहत होती. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

(हेही वाचा-Central Government: वडा पावचा स्टॉल टाकताय? तर आता तुम्हाला द्यावी लागणार ५० मार्क्सची परिक्षा; सरकारचे नवे आदेश)

पाइपलाइन रोडजवळ वीरन्ना भवन इमारतीत ही घटना उघडकीस आली आहे. शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी महालक्ष्मी हिच्या नातेवाइकांना कळवले. शनिवारी महालक्ष्मी हिची आई आणि बहीण यांनी तिथे येऊन घरात प्रवेश केला, तेव्हा ही धक्कादायक बाब उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या इमारतीकडे जाणारा रस्ता बॅरिकेड लावून बंद केला. (Bengaluru Woman Murder)

(हेही वाचा-Election Commission चे पथक 27 रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर)

श्वानपथक, तसेच फोरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी तपास सुरू केला आहे. ही महिला मूळची कर्नाटकाबाहेरील होती, मात्र राज्यात स्थायिक झाली होती, अशी माहिती कुमार यांनी दिली. ती पश्चिम बंगाल किंवा छत्तीसगडमधील असल्याची माहिती देण्यात आली. महालक्ष्मी ही पतीपासून विभक्त, एकटीच राहत होती, अशी माहिती समोर आली आहे. ती एका मॉलमध्ये काम करत होती. तर, तिच्या पतीचे नाव राणा असल्याचे तसेच शहरापासून दूर काम करीत असल्याचे समोर आले. (Bengaluru Woman Murder)

या घटनेची माहिती मिळताच नवरा घटनास्थळी दाखल झाला. मागील पाच-सहा महिन्यांपासून महालक्ष्मी या घरात राहत होती. ती शेजारी कोणामध्ये फारशी मिसळत नव्हती. काही दिवस तिचा भाऊ तिच्यासोबत राहत होता, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. (Bengaluru Woman Murder)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.